अभिषेक विचारेंच्या 'द गर्ल हू गॉट लेबल्ड'ला वाचकांची पसंती

kadambari
Last Modified गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (21:20 IST)
२०२०-२१ मधील सर्वाधिक खप असणाऱ्या अभिषेक विचारे यांच्या 'द गर्ल हू गॉट लेबल्ड' या कादंबरीला कोरोना सारख्या महामारीतही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाच्या या तणावपूर्ण आणि नकारात्मक वातावरणात वाचकांना आनंद आणि सकारात्मकता देण्याचे काम विचारे यांच्या कादंबरीने केले आहे. २०२१ मध्येही टाईम्सच्या सर्वाधिक खप असणाऱ्या पुस्तकांच्या यादीत या कादंबरीने आपले स्थान टिकवून ठेवले आहे. पूर्णपणे वेगळी पार्श्वभूमी असणाऱ्या लेखकाला पदार्पणातच इतके यश मिळावे, हे लक्षणीय आहे. कधीकधी व्यवसाय हा फक्त नावापुरताच असतो. अंगातील कलागुण लोकांमध्ये खरी ओळख मिळवून देतात. अभिषेक विचारे हे त्यापैकीच एक आहेत.

'द गर्ल हू गॉट लेबल्ड' ही प्रेमकथा असलेली कांदबरी जुलै २०२० मध्ये वाचकांसाठी उपलब्ध झाली आणि तेव्हापासून ते आतापर्यंत या कांदबरीची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. ही गोष्ट आहे अनुपमाची, तिच्या जीवन प्रवासाची, तिच्या प्रेमाची. ज्यांनी आयुष्यात प्रेम, दुःख, नकार हे अनुभवले आहे, त्यांना हे पुस्तक स्पर्शून जाते. कोविड-१९ चा अनेक पुस्तकांच्या विक्रीवर परिणाम झाला मात्र काही पुस्तके त्याला अपवाद ठरली. वाचकांना गुंतवून ठेवणारे कथानक, रंजकपणे गोष्ट सांगण्याची कला या बाबींमुळे अभिषेक विचारे यांचे 'द गर्ल हू गॉट लेबल्ड' हे पुस्तक उजवे ठरते.

मार्केटिंग, उद्योग, तंत्रज्ञान अशा वेगवेगळ्या क्षेत्रात विचारे यांनी काम केले आहे. त्यांचा ‘रिचमंड’ हा भारतातील प्रसिद्ध उद्योगसमूह आहे. मुंबई विद्यापीठातील
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन या विषयात ते पदवीधर आहेत. तसेच इंग्लंड विद्यापीठातून मोबाईल अँड सॅटेलाईट कम्युनिकेशन या विषयात त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. अभिषेक यांनी लंडनमध्ये ब्रँड अँबॅसिटर म्हणून काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी लंडनमध्ये स्वतःची मार्केटिंग फर्मही उघडली आहे. मात्र आता स्वतःच्या पॅशनला प्राधान्य देत 'द गर्ल हू गॉट लेबल्ड' ही पहिली कादंबरी त्यांनी वाचक प्रेमींसाठी उपलब्ध केली आहे.''
'द गर्ल हू गॉट लेबल्ड' या कादंबरीबद्दल लेखक अभिषेक विचारे सांगतात, '' मी शिक्षणाने इंजिनियर आणि व्यवसायाने उद्योजक जरी असलो तरी माझी खरी आवड लेखन हीच आहे. लिखाण हे नेहमीच माझे व्यक्त होण्याचे माध्यम राहिले आहे. माझ्या पहिल्याच पुस्तकाला मिळणाऱ्या वाचकांच्या प्रतिसादामुळे मी आनंदी आहे. पुढील लिखाणसाठी ते मला प्रोत्साहीत करते. अनुपमाची गोष्ट मला खूप जवळची आहे. माझ्या आयुष्यातील काही अनुभव त्यात आहेत. ही कादंबरी वाचकांच्या मनाला भिडण्याचे कारण कथेतील खरेपणा आहे. मला आशा आहे, या कादंबरीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत जाईल.

कोरोना काळातही २०२० मध्ये आलेल्या अभिषेक विचारे यांच्या 'द गर्ल हू गॉट लेबल्ड' या कादंबरीला वाचकप्रेमींचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. अमेझॉनच्या उत्तम पुस्तकांच्या यादीमध्ये या पुस्तकाचा समावेश असून जगभरातील वाचकप्रेमींसाठी अमेझॉनवर ते उपलब्ध आहे.


यावर अधिक वाचा :

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी ...

राजस्थान सरकारने मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी अवनी लेखरा आणि कृष्णा नगर यांच्या नावाची शिफारस केली
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून देशाचा मान उंचावणाऱ्या अवनी लेखरा आणि कृष्णा ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, ...

New Income Tax Portal: आयटी पोर्टलमध्ये होत आहे सुधार, Infosysने 90% त्रुटी दूर केल्या आहेत
देशातील आघाडीची सॉफ्टवेअर सेवा कंपनी इन्फोसिसने आयकर ई-फायलिंग पोर्टलमधील बहुतांश त्रुटी ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश ...

खाजगी शाळांना 2021-22 च्या सत्रात गरीब मुलांना प्रवेश द्यावा लागेल, उच्च न्यायालयाचे आदेश
2021-22 या शैक्षणिक सत्रासाठी खाजगी शाळा चालकांना नियम 134A अंतर्गत गरीब मुलांना ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू ...

धक्कादायक ! डोंबिवलीत आठ महिन्याच्या मुलीला वडिलांनी दारू पाजली ,आणि 9 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला
दारू चे व्यसन खूपच वाईट असते. दारुच्या नशेत माणूस हैवान बनतो, तो काय करत आहे त्याला ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी ...

वृद्ध महिलेची मुख्यमंत्र्यांकडे आत्महत्या करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यात इंदगावच्या 65 वर्षीय अजनी चाबके या वृद्ध महिले ने ...

MPPSC मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या या 5 भरतीसाठी अर्ज ...

MPPSC मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाच्या या 5 भरतीसाठी अर्ज पुन्हा सुरू होतील, सूचना वाचा
मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाने सहा भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. आयोगाने ...

शिलाजीत महिलांसाठी खूप उपयोगी, वाचून हैराण व्हाल

शिलाजीत महिलांसाठी खूप उपयोगी, वाचून हैराण व्हाल
जेव्हाही शिलाजीतचा विचार केला जातो तेव्हा पुरुषांसाठी त्याच्या फायद्यांबद्दल चर्चा केली ...

वाईट लोक गोड बोलून अडचणी वाढवतात, अशा लोकांपासून दूर राहणे ...

वाईट लोक गोड बोलून अडचणी वाढवतात, अशा लोकांपासून दूर राहणे योग्य
कथा - रामायणात कैकेयी खूप आनंदी होती, कारण श्री राम राजा होणार होते. कैकेयीची दासी मंथरा ...

सर्दी- खोकला यावर घरगुती उपायाने त्वरित आराम मिळवा

सर्दी- खोकला यावर घरगुती उपायाने त्वरित आराम मिळवा
चोंदलेले नाक,घसा खवखवणे,खोकला !ही लक्षणे कोरोनाच्या कालावधीत आढळल्यावर घाबरायला होत. खरं ...

सुटलं हातून म्हणून काय झालं बरं?

सुटलं हातून म्हणून काय झालं बरं?
मागं वळून बघतांना, सहज नजर गेली जे सुटून गेलं, ते ही गेलं होतं बदलून, जे होतं तेव्हा ...