शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By

मराठी भाषेसाठी मॉरीशसचे विलक्षण प्रेम

वर्तमान काळात महाराष्ट्रात मराठी भाषेला टिकवण्यासाठी समाजाने प्रयत्न केले पाहिजे अशी आवाज येत असली अशात परदेशात मराठी भाषा जपण्याचा पुरेपूर प्रयत्न होत आहे हे मात्र कौतुक करण्यासारखे आहे. होय मॉरीशचचे मराठी भाषेप्रती प्रेम बघून तर असेच काही म्हणावे लागेल.
 
'कोणतीही भाषा गेली तर संस्कृती गेली. संस्कृती गेली तर माणूसच संपेल. म्हणून मराठी वाढविण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करायला हवेत' हा मंत्र आहे मॉरिशसच्या डॉ. हेमराजन गौरिया, श्री राम मालू, आणि सुना धर्मिया यांचा. 
 
डॉ. हेमराजन गौरिया महात्मा गांधी इंस्टिट्यूटमध्ये प्राध्यापक, श्री राम कवी आणि धर्मिया नाटककार आहे. डॉ. हेमराजन म्हणाले, 'मॉरीशस सरकार मराठीच्या विकासासाठी अनुदान देते.' विदेशात आपल्या मराठी भाषेकडे ऐवढे लक्ष दिले जात आहे, ही अभिमानाचीच नव्हे तर शिकण्यासारखी बाब आहे. आपली मराठी संस्कृती, भाषा जिवंत ठेवण्यासाठी मॉरीशस सरकारच्या प्रयत्नांचे कौतुक केले पाहिजे.
 
1969 मध्ये हा देश स्वतंत्र झाला. क्रिओल ही त्यांची भाषा. देश स्वतंत्र झाल्यावर नागपूर येथील प्रा. गजानन जोशी येथे आले आणि त्यांनी मराठी लोकांना एकत्र आणले. मराठी शिकवायला प्रारंभ केलं. आपल्या मराठी भाषी पूर्वजांना ब्रिटिशांनी भ्रामकपणे मॉरीशस नेलं. या प्रकारे येथे मराठी पिढी वाढली आणी मराठी संस्कृतीशी नाळ कायम राहिली. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मराठी भाषेबाबत ही माहिती दिली मॉरिशसच्या या पदाधिकाऱ्यांनी.
 
सुना धर्मिया यांनी 125 नाटकांची निर्मिती केली तर श्री राम यांनी अनेक कविता लिहिल्या. मॉरीशस सरकारने संसदेत प्रस्ताव मांडला आणि मराठीसाठी प्रयत्न केले गेले.  येथे दरवर्षी मराठी नाट्यमहोत्सव होतो. दरवर्षी दोन-तीन नाटक सादर होतात. प्रथम येणार्‍या विद्यार्थ्यांना भारत सरकारकडून स्कॉलरशिप दिली जाते असे ही त्यांनी सांगितले.