सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी लेखक
Written By
Last Modified: बुधवार, 23 जून 2021 (09:16 IST)

कवयित्री आणि कथालेखिका इंदिरा संत

कवयित्री आणि कथालेखिका इंदिरा संत यांचा जन्म 4 जानेवारी 1914 रोजी कर्नाटकाच्या इंडी या गावात झाला. कोल्हापूर व पुणे येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.बी.ए.,बी.टी.डी. व बी.एड.या पदव्या प्राप्त केल्यानंतर बेळगावच्या ट्रेनिंग कॉलेजात अध्यापिका म्हणून काम केले.त्यांचा विवाह सहाध्यायी नारायण संत यांच्याशी झाला.
 
शिक्षकीपेशा स्वीकारलेल्या इंदिरा संतांनी लहान मुलांच्या कथा लिहून आपल्या लिखाणाला सुरुवात केली.त्यांनी स्त्रीवादी कविता लिहण्यावर आपले लक्ष केंद्रित केले.त्यांनी भारतीय स्त्रीचे खडतर जीवन आपल्या कवितेतून मांडले.इंदिरा संत आणि त्यांचे पती नारायण संत यांचा एकत्र एक कविता संग्रह 'सहवास'प्रसिद्द्ध आहे.पतीच्या निधनानंतर त्यांनी आपल्या कवितेवर त्याचे परिणाम होऊ दिले नाही.  

इंदिरा संतांनी लिहिलेल्या प्रत्येक रचनेला काव्य रसिकांनी भरभरून दाद दिली. यांची सुमारे 25 पुस्तके प्रसिद्ध झाली आहे.यांच्या काही निवडक कविता 'मृण्मयी' या नावाने प्रसिद्ध झाल्या.यांचे निधन 13 जुलै 2000 रोजी पुण्यात झाले.

यांना साहित्य अकादमी पुरस्कार,अनंत काणेकर पुरस्कार,साहित्य कला अकादमी पुरस्कार,महाराष्ट्र शासन पुरस्कार,जनस्थान पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
 

कविता संग्रह -गर्भरेशीम,निराकार,बाहुल्या,मरवा,मृगजळ मेंदी,रंगबावरी,वंशकुसूम,शेला, या त्यांच्या काही कविता संग्रह आहे.
 
कथासंग्रह-कदली,चैतू,श्यामली,हे त्यांचे कथासंग्रह आहे.

कादंबरी-घुंघरवाळा ही त्यांची कादंबरी आहे.