शुक्रवार, 6 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: मंगळवार, 27 एप्रिल 2021 (14:32 IST)

कविता म्हणजे अंतर्मनाशी होणारा हळुवार सुसंवाद: डॉ. मधुसूदन घाणेकर

International Poetess संस्थेतर्फे नुकतेच पहिले आंतरराष्ट्रीय ऑनलाईन निमंत्रित कवयित्रि संमेलन जागतिक काव्यदिन निमित्त आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ कवी डॉ. मधुसूदन घाणेकर होते. संमेलनाच्या मुख्य निमंत्रक, प्रसिद्ध कवयित्री कोमल माळी यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. सहनिमंत्रक युवा कवयित्री प्रिया पाडळीकर (डॅलस, अमेरिका) आणि ऋचा कर्वे यांनी संयोजन केले. आघाडीच्या कवयित्री मानिनी महाजन (मुंबई) यांच्या शुभहस्ते उदघाटन करण्यात आले. ऋचा कर्वे 
यांनी अतिथी परिचय करुन दिला.

संमेलनात 4 दिव्यांग कवयित्रींसह 16 राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कवयित्रींनी आपल्या अत्यंत प्रगल्भ अशा कविता सादर केल्या. गीतकार ऋचा थत्ते यांचे मागणे विश्वासाठी हे गीत तन्मयी भिडे आणि सहकारी यांनी प्रारंभी सादर केले. उदघाटन सत्रात डॉ. मधुसूदन घाणेकर संपादित डहाळी संमेलन विशेषांकाचे प्रकाशन कवयित्री ऋचा कर्पे, विशेष अतिथी (मध्य प्रदेश) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
 
संमेलनाध्यक्ष डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी अध्यक्षीय भाषणात संमेलनात मौलिक मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणाचा गोषवारा...डॉ. मधुसूदन घाणेकर म्हणाले " कविता म्हणजे आपल्या अंतर्मनाशी आपणच केलेला तरल, हळुवार असा मुक्त सुसंवाद. अनुभूति आणि प्रतिभेचा मिलाप झाला की उत्स्फूर्त काव्याविष्कार साकार होतो. 
जगाच्या अंतापर्यंत सुख..दुःख..स्वप्न..प्रेम..अन्याय..यश...अपयश..या सर्व गोष्टी राहणारच. फक्त प्रतिभावंत स्वतःच्या अनुभूतिमधून कल्पनाशक्तीच्या आधारे समर्पक प्रतिमांच्या या गोष्टी कशा प्रकारे साकार करतो यावर त्याच्या निर्मितीची शाश्वतता अवलंबून असते.
 
निसर्गतःच स्त्रीकडे सोशिकता अधिक प्रमाणात असते कारण तीला पोटात जपलेल्या 9 महिन्याच्या गर्भातून एक नवजीवन साकारायचे असते. त्यामुळे तीला वेदनेचा नेमका अर्थ झटकन समजू शकतो. यामुळे नातेसंबंध आणि तणावात्मक समाजावर हळुवार फुंकर घालण्याची प्रभावी क्षमता कवयित्रींमधे अधिक असते."

संमेलनातील कवितांवर प्रकाशझोत टाकताना डॉ. मधुसूदन घाणेकर म्हणाले, "प्रत्येक कवयित्रीची कविता आत्म अनुभूतिची होती. निखळ, प्रामाणिक, अनुकरण. विरहित, स्वतंत्र होती. कुठेही बंडखोरी नव्हती. कविता संयमित, वास्तववादी, सकारात्मक आणि अंतर्मुख करायला लावणारी होती. यामुळे आगामी काळात या कवयित्रींकडून अधिक  विश्वात्मक काव्यनिर्मिती निश्चितच अपेक्षाmउंचावल्या आहेत."

संमेलनात 4 दिव्यांग कवयित्रींनी पूर्णपणे आशादायी-प्रेरणादायी कविता सादर केल्याबद्दल डॉ. घाणेकर यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. या दिव्यांग कवयित्रींची दखल जागतिक पातळीवरील काव्यचळवळीने अधिक प्राधान्याने घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी केली. संमेलनाच्या समारोपात संमेलनाध्यक्ष डॉ. घाणेकर यांच्या शुभहस्ते सर्व निमंत्रित कवयित्रींना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
International Poetess Award 
मानकरी: कोमल माळी, अपर्णा आंबेडकर, ऋचा थत्ते, ऋचा कर्वे, ऋचा कर्पे, मंजिरी सरदेशमुख, तेजस्विनी थिटे, मानिनी महाजन, उमा जोशी (सर्व महाराष्ट्र) डॉ. संगीता तोडमल (अमेरिका), शैलजा लिमये (कॅनडा) इंदू पांडे (वाराणसी), मंजिरी जोशी(usa) डॉ. मानसी मोहरिल (नेदरलॅंड), डॉ. गीता सहारिया (गुवाहाटी), ऋचा कर्पे (म.प्र.) आणि प्रिया पाडळीकर (डॅलस,अमेरिका )
 
Centurian International Award For Poetry 2021
तिन्ही दिव्यांग कवयित्रीं
कोमल माळी, ऋचा कर्पे आणि मानिनी महाजन 
 
International Lifetime Achievement Award For Poetry 2021
ज्येष्ठ दिव्यांग कवयित्री उमा अनंत जोशी- पुणे, महाराष्ट्र.