पुस्तकं असतात ज्ञानाचा दिवा
पुस्तकं असतात ज्ञानाचा दिवा,
एक असा मित्र जो सोबत हवा,
मार्ग कितीही असो खडबडीत,
मार्गदर्शन पुस्तक देते त्यास त्वरित,
समृद्ध होतात विचार, वा चनाने,
परिपक्व होतो माणूस,पुस्तकाने,
लाख मोलाची आहे ही दौलत खरी,
तेजोमय होते माणसाची वैखरी,
प्रवास वर्णने असो की कादंबरी,
वाचत जवीशी वाटतात कितीतरी,
राजा असो की रंक, होती ह्याचेसोबती,
नौका पार करविते पुस्तकाशी दोस्ती.!
...अश्विनी थत्ते