शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालगित
Written By
Last Modified: बुधवार, 14 एप्रिल 2021 (15:33 IST)

बालगीत : सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय?

सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥
 
भोलानाथ ! दुपारी आई झोपेल काय
लाडू हळुच घेताना आवाज होईल काय
भोलानाथ ! भोलानाथ !!
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ॥१॥
 
भोलानाथ ! भोलानाथ !! खरं सांग एकदा
आठवड्यात रविवार येतील का रे तीनदा
भोलानाथ ! भोलानाथ !!
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ॥२॥
 
भोलानाथ ! उद्या आहे गणिताचा पेपर
पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर
भोलानाथ ! भोलानाथ !!
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ॥३॥
 
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय ॥धृ॥
सांग सांग भोलानाथ । पाऊस पडेल काय ?
 
गीतकार : मंगेश पाडगावकर 
संगीतकार : मीना खडीकर
गायक : योगेश खडीकर, रचना खडीकर, शमा खळे