1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
  4. Aatatayi Abhang marathi kavita

आतातायी अभंग

Aatatayi
कारे नाडवीसी | आपुल्या मनासी ;
पोषितो कुणासी ?| जगी कोण ?
महारोग्यापोटी | पोरांची खिल्लारे ;
जीवन तया रे | कोण देतो ?
 
कोणे केली बाळा | दु:खाची उत्पत्ती
वाढवी श्रीपती | पाप-पुण्य
कोणी दिली भूक ? | कोणे दिले रोग?
दारिद्र्याचे भोग दिले कोणी ?
दु:खाच्या अनंता | भोगितो संसार ;
येई भागाकार | आत्मरुपे.
आत्म्याचे हे गुह्य | ब्रह्माला ना ठावे ;
त्याच्या वंशा जावे | तेव्हा कळे.
जन्माच्या प्रश्नाला | मृत्युचे उत्तर;
देई विश्वंभर | दुजे काय ?
 
– विंदा करंदीकर
 
 
 
पुढील लेख
करिअरची निवड करताना या 5 गोष्टी लक्षात ठेवा