नाव : फकीरराव मुंजाजी शिंदे : फ. मुं. जन्म : १२ ऑगस्ट १९४८ जन्मगाव : मु. रुपूर, पो. नांदापूर, ता. कळमनुरी, जि. हिंगोली (मराठवाडा) शिक्षण : एम. ए. (मराठी भाषा आणि वाङ्मय) १९७२ : प्रथम श्रेणीत सर्वप्रथम कविवर्य वा. गो. मायदेव पारितोषिक व्यवसाय : १९७२ ते २००२ मराठीचे अध्यापन, पदवी आणि पदव्युत्तर वर्ग. देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद विद्यमान अध्यक्ष : रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, महाराष्ट्र शासन, मुंबई २००० ते आजतागायत : गेली १३ वर्षे प्रकाशित साहित्य : २७ कविता संग्रह, ३ समीक्षासंग्रह, राजकीय उपहासिकासंग्रह, विचारशील विनोदपर गद्यसंग्रह, बुध्दजीवनाच्या एकांकिकांचा संग्रह, रतनलाल सोनग्रा यांच्या ‘क्रांतिबा फुले’ या हिंदी नाटकाचा मराठी अनुवाद. महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार अ) उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचे महाराष्ट्र शासनाचे वाङ्मय पुरस्कार १. उत्कृष्ट काव्यलेखनासाठी सतत तीन वेळा कवी केशवसुत पुरस्कार. २. समीक्षालेखनासाठी विशेष पुरस्कार. ३. विनोदपर लेखनासाठी अत्रे कोल्हटकर पुरस्कार. ४. एकांकिका लेखनासाठी पुरस्कार. ब) इतर संस्थांचे वाङ्मय पुरस्कार १. पुणे मसापचा कवी यशवंत पुरस्कार. २.पुणे मसापचा कवी भा. रा. तांबे पुरस्कार. ३. सोलापूरचा दमाणी पुरस्कार. ४. मुंबईचा नानक रुपानीचा प्रियदर्शनी साहित्य पुरस्कार. ५. राष्ट्रीय बहुजन विकास महासंघाचा साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरस्कार. ६. नांदेडचा प्रसाद बन साहित्य पुरस्कार. अ) कविसंमेलनांचे अध्यक्षपद १. अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील मुख्य काव्यसंमेलनाचे दोन वेळा अध्यक्ष. २. अ. भा. मराठी साहित्य संमेलनातील नवोदितांच्या काव्यसंमेलनाचे तीन वेळा अध्यक्ष. ३. अ. भा. त्रैभाषिक (मराठी, उर्दू, हिंदी) संमेलनातील मराठी काव्यसंमेलनाचे अध्यक्ष. ४. प्रजासत्ताकदिनाच्या राष्ट्रीय कविसंमेलनात मराठीचे प्रतिनिधित्व, दिल्ली. ५. साहित्य अकादमी आयोजित काव्यवाचनाचा स्वतंत्र कार्यक्रम, मुंबई ब) अभ्यासक्रमात साहित्याचा समावेश राज्यातील जवळपास सर्वच विद्यापीठांत कविता व कथांचा समावेश. महाराष्ट्र लोकसेवा अयोगाच्या मराठी अभ्यासक्रमात ‘सूर्यमुद्रा’ काव्यसंग्रहाचा समावेश. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ : ‘विद्यापीठगीत लेखन’ . गीत लेखन : १. नऊ मराठी चित्रपट. २. मालिका शीर्षकगीत. पत्ता : ‘यमुना’ ८३, म. गांधीनगर, पद्मपुरा, औरंगाबाद ४३१००५, महाराष्ट्र