शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By भीका शर्मा|

पोपटांची हनुमानभक्ती

WD
परमेश्वरची भक्ती व प्राणीमात्रांवर दया करणे, ही भारतीय संस्कृती आहे. आपण कितीही श्रीमंत असो अथवा गरीब. गोरगरिबांना मदत आणि प्राणीमात्रांवर दया करणे, हे आपल्यावर असलेले संस्कार आहेत. या संस्कारातूनच मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका हजारो क्विंटल धान्य छतावर पसरविले जाते आणि भाविकही या पक्षांसाठी हे धान्य मंदिरात दान करतात. प्राणीमात्रांवर दया करण्याचा हा संस्कार अशा रितीने येथे जपला जात आहे.

इंदूर हे मध्य प्रदेशातील व्यापारी शहर असल्याने प्रचंड वाहतूक, नागरिकांची गदीँ आहे. असे असूनही या शहरात असा एक परिसर आहे जेथे हजारो काय लाखोंच्या संख्येने पोपट येतात. 'पंचकुईया हनुमान मंदिर' या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्राचीन मंदिराचा हा परिसर आहे. या मंदिर परिसरात महादेवाचे मंदिर आहे. येथे रोज भाविक मोठ्या संख्येने येतात. आणि या भाविकांत असतात पोपटही.

WD
मंदिराच्या परिसरात राहणार्‍या साधुंच्या मते गेल्या अनेक वर्षांपासून हजारो-लाखो पोपट न चुकता येथे हजेरी लावतात. पोपटांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रत्येक दिवशी न चुकता सुमारे 4 क्विटंल धान्य या पोपटांसह इतर पक्षांसाठी छतावर पसरविण्यात येते. येथे येणार्‍या पोपटांची परमेश्वर भक्ती पाहण्यासारखी आहे. धान्याचा दाणा पोपट चोचीत घेऊन हनुमानाच्या प्रतिमेकडे तोंड करतात आणि मग नतमस्तक होऊन पश्चिम दिशेला तोंड करून धान्य खातात.

WD
पोपटांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या पाहून काही वर्षांपूर्वी मंदिराचे प्रशासन व भाविक यांच्या संयुक्त विद्यमाने येथे तीन हजार स्क्वेअर फुटाचे मोठे छत तयार करण्यात आले आहे. पोपटांसाठी तेथे दररोज धान्य पसरविण्याचे काम रमेश अग्रवाल करतात. रोज सकाळी साडे पाच ते सहाच्या दरम्यान व सायंकाळी चार ते पाच दरम्यान धान्य पसरवले जाते. ते धान्य पोपट एक ते सव्वा तासातच खाऊन टाकतात. पक्षांच्या संख्येनुसार धान्य पसरविण्याचे प्रमाण कमी जास्त केले जाते.

याला परमेश्वर व पोपटांमधील अद्वैतभावच म्हणावा लागेल. ज्याप्रमाणे परेमश्वरासमोर हजारोंच्या संख्येने भक्तगण प्रसाद ग्रहण करतात. अगदी त्याचप्रमाने या मंदिरात हजारोंच्या संख्येत पोपट परमेश्वराला नमन करून धान्याचा प्रसाद ग्रहण करताना दृष्टीस पडतात. पोपटांची ही परमेश्वर भक्ति कशी वाटली ? आम्हाला जरूर कळवा.