दक्षिणेतील कनक दुर्गा माता
|
कनक दुर्गा मातेचे मंदिर इंद्रकिलाद्री पर्वतावर अगदी उंचावर वसले आहे. खालून वाहणारी कृष्णा नदी वातावरणाचे पावित्र्य आणखी वाढविते. कनकदुर्गेला स्वयंभू देवता म्हणून संबोधले जाते. म्हणूनच तिची प्रभावशक्ती मोठी असल्याचे मानले जाते.
याच जागी शिवाने पांडवांपैकी अर्जुनाला पशुपती अस्त्र दिले होते. या मंदिराची स्थापना अर्जुनाने केली, अशी श्रद्धा आहे. आदी शंकराचार्यांनी या ठिकाणी भेट देऊन श्री चक्राची प्रतिष्ठापना केली आणि वैदिक पद्धतीने कनकदुर्गा देवीच्या पूजेची परंपरा सुरू केली.
या देवीसंदर्भात पौराणिक कथाही आहे. देवी
|
याच देवीने महिषासूराला मारण्यासाठी महिषासूराचा अवतार घेतला. अष्टहात, त्यात विविध शस्त्रे, सिंहावरून जाणारी ही महिषासूरमर्दिनी आहे. या पर्वताला लागूनच शिवाने ज्योतिर्लिंगाच्या रूपात वास्तव्य केले आहे. ब्रह्मदेवाने शिवाची भक्ती येथेच केली. त्याला म्हणून त्याला मल्लेश्वर स्वामी हे नाव पडले.
देवाचा राजा इंद्र याने या पर्वताला भेट दिली होती. म्हणून त्याला इंद्रकिलाद्री हे नाव मिळाले. येथे दुर्गा मल्लेश्वराच्या उजव्या बाजूला आहे. एरवी पुरूष देवतेच्या डाव्या बाजूला स्त्री देवता असते. म्हणूनही हे स्थान इतरांपेक्षा वेगळे आहे.
|
मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग-
विजयवाडा शहरात हे मंदिर रेल्वे स्टेशनापासून अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. हे शहर हैदराबादपासून 275 किलोमीटरवर आहे. हे शहर रस्ता, रेल्वे व हवाई सेवेने पूर्ण देशाशी जोडले आहे.
