बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By वेबदुनिया|

नेमावर प्राचीन सिद्धनाथ महादेव

नर्मदा नदिच्या तिरावर वसलेल्या सिद्धनाथ महादेवाच्या पावन स्पर्शाने पूणीत झालेल्या नेमावर नगरीत. महाभारताच्या काळात नाभिपूर या नावाने प्रसिध्द असलेल्या शहराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून आता तर सर्वत्र पर्यंटक स्थळ म्हणून प्रचलित आहे. राज्य शासनाच्या गॅझेटम्ध्ये 'नाभापट्टम' या नावाने या शहराची नोंद आहे. याच शहरात नर्मदा नदीचे 'नाभि' स्थान आहे.

सिद्धनाथ मंदिराच्या शिवलिंगाची स्थपना सतीयुगात चार सिद्ध ऋषि सनक, सनन्दन, सनातन व सनतकुमार यांनी केली होती, अशी आख्यायिका आहे. यावरून या मंदिराचे नाव सिद्धनाथ पडले आहे. सिध्दनाथाच्या वरच्या भागात ओंकारेश्वर व खालच्या भागात महाकालेश्वर स्थित आहेत.

WD
सिध्दनाथाच्या संदर्भात येथे अशी आख्यायिका सांगितली जाते की, इस. पूर्व 3094 मध्ये या पर्वताची निर्मिती झाली आहे. व्दापर युगात कौरवांकडून हे मंदिर पूर्वमुखी तयार करण्यात आले होते. त्यानंतर पांडवपूत्र भीमाने आपल्या बाहूबलाने मंदिराला पश्चिममुखी केले होते.

येथील श्रध्दाळु भाविकांकडून असे सांगितले जाते की, सिध्दनाथ मंदिराच्या शेजारून वाहणार्‍या नर्मदा नदीच्या तिरावरच्या वाळुवर सकाळी सकाळी मोठ-मोठ्या पावलांची ठसे उमटलेले दिसतात व या ठस्यावर कृष्ठरोगाने पिडीत नागरिक कृष्ठरोगापासून स्वत:ची मुक्तता करून घेण्यासाठी लोटांगण घालतात. येथील वयोवृध्द ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, आजु बाजुच्या पर्वतांमधील गुफा व कपारींमध्ये तपश्चर्या करणारे साधु प्रात:काळी नर्मदा नदीवर स्नान करण्यासाठी येतात. नेमावर शहराच्या आजुबाजुला प्राचीनकाळातील अनेक विशाल पुरातात्विक अवशेष आहेत.

हिंदू व जैन ग्रंथामध्ये या स्थानाचा खुप वेळा उल्लेख करण्यात आला आहे. सिध्दनाथ मंदिराची 'पापांचे नाश करणारा सिद्धिदाता ‍तीर्थस्थान' या नावाने ओळख आहे.

WD
नर्मदा नदीच्या तिरावर वसलेले हे मंदिर हिंदू धर्माचे प्रमुख श्रध्दास्थळ आहे. 10व्या व 11व्या शतकात चंदेल व परमार या राजांनी या मंदिराचा जिर्नोध्दार केला होता. मंदिराला पाहिल्यावरुच हे मंदिर किती प्राचीनकालीन आहे याची प्रचिती येते. मंदिराच्या सभामंडपातील स्तंभ व भिंतीच्या शिलेवर शिव, यमराज, भैरव, श्रीगणेश, इंद्राणी व चामुंडाच्या सुंदर मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. तसेच आकर्षक प्रचीन नक्षीकाम देखील करण्यात आले आहे.

येथे शिवरात्रि, संक्रांति, ग्रहण, अमावस्या आदी शुभपर्वावर श्रद्धाळु भावीक स्नान करण्यासाठी येतात. साधु-महंत ही पवित्र नर्मदा मातेचे दर्शन घेण्यासाठी अधुन मधुन येत असतात.

कसे जाल : इंदौर शहरापासून 130 कि. मी. अंतरावर दक्षिण-पूर्व दिशेला असलेल्या हरदा रेल्वे स्थानकापासून 22 कि.मी. अंतरावर नेमावर शहर आहे. त्याचप्रमाणे उत्तर दिशाकडून भोपाळपासून 170 कि.मी. अंतरावर पूर्व दिशेत नेमावर हे प्राचीन शहर आहे. या स्थळी नर्मदा नदीचे पात्र 700 मीटर रूंद आहे.