1. धर्म
  2. »
  3. धर्मयात्रा
  4. »
  5. धर्मयात्रा लेख
Written By वेबदुनिया|

योगेंद्र शीलनाथ बाबा

अनिरूद्ध जोशी

योगेंद्र शीलनाथ बाबा
WDWD
वेबदुनियाच्या 'धर्मयात्रा' या सदरात आज आम्ही आपल्याला योगेंद्र शीलनाथ बाबांचे दर्शन घडविणार आहोत.मध्यप्रदेशातील देवास येथे श्रीगुरु योगेंद्र शीलनाथ बाबांची अखंड धुनी (ज्योत) आहे. सुमारे शंभर वर्षापूर्वीची त्यांची खडाऊ आणि पलंग आजही तसाच असून त्यांच्या शयनगृहाखाली असलेल्या तळघराच्या विहीरीतील गुहा कायम आहे.

इंदूर व उज्जैन येथे असलेल्या त्यांच्या तपोभूमीचे दर्शन घेण्यासाठी आजही भाविक येतात. तपोभूमीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना शांती अनुभवाला म‍िळते. बाबाच्या दरबारात आलेल्या प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते, अशी श्रद्धा त्यांच्यामध्ये आहे. आपल्या आयुष्यातील प्रत्येक कार्यात त्याला यश प्राप्त होते. अशा प्रकारच्या चमत्कारीक कार्यामुळे संपूर्ण देवास शहर बाबांच्या चरणी पडलेले दिसते. बाबाला अपवित्रता अजिबात सहन होत नसल्याचे स्थानिक रहीवाश्यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले. मल्हार धुनी एक तपोभूमी असून येथे बाबांच्या शिष्यांची समाधी स्थळे अधिक आहेत.

विहीरीतील गुहेतून बाबा सरळ हरिद्वारला जात असत आणि स्नान करून पुन्हा त्याच गुहेतून येत होते, असे सांगितले जाते. शहरातील अनेक प्रतिष्‍ठीत लोकांनी त्यांना हरिद्वारमध्ये स्नान करताना पाहिले होते. कारण, ते नेहमी स्नान करायला हरिद्वारला जायचे. धुनी फिरवत असताना बाबाजवळ जंगलातील वाघ, सिंह आणि इतर प्राणी येऊन बसत असत. एक सिं
  विहीरीतील गुहेतून बाबा सरळ हरिद्वारला जात असत आणि स्नान करून पुन्हा त्याच गुहेतून येत होते, असे सांगितले जाते. शहरातील अनेक प्रतिष्‍ठीत लोकांनी त्यांना हरिद्वारमध्ये स्नान करताना पाहिले होते.      
ह त्यांच्याबरोबर नेहमी राहत असे. ते त्याला रोज जेवण देत असत. सिंहाला राहण्यासाठी त्यांनी एक पिंजरा बनविला होता. बाबा एका पायरीद्वारे पिंजर्‍यात उतरून सिंहाला जेवण देत असत.

भारतीय संत परंपरेतील गुरू गोरखनाथ हे एक आहेत. त्यांचा नेपाळशी घनिष्ट संबंध होता. नेपाळ नरेश महेंद्रदेव त्यांचे शिष्य होते. त्या काळात गोरखनाथाने नेपाळच्या एका भागात आपला डेरा टाकल्यामुळे त्या भागाला 'गोरखा राज्य' असे म्हटले जात होते. त्यानंतर येथील लोक गोरखा म्हणून ओळखले जाऊ लागले. गोरखनाथांच्या धुनीचे येथील हजारो शिष्यांनी जगभरात प्रसार केला.

नवनाथांच्या परंपरेत अनेक सिद्
WDWD
महायोगी पुरूष जन्माला आले होते. आसाम, अरूणाचल, अफगाणिस्तानच्या हिंदू कुश पर्वतापर्यंत त्यांचे अस्तित्व पसरलेले होते. ज्या ठिकाणी नवनाथांची धुनी पेटली होती त्या ठिकाणी योगपीठे निर्माण झाले असल्याचे मानले जाते. त्यापैकी एक पंजाबच्या हिसार जिल्ह्यातील सुलतानपूर गावात होते. येथील पीठाधीपती इलायचीनाथ महाराज होते. पंजाब, काश्मीर, सिंध, क्वेटा, काबूल, कंदहार, चमन, महाराष्ट्र आणि मालवा इत्यादी ठिकाणी त्यांच्या शिष्यांच्या शाखा विखुरलेल्या होत्या. याच योगपीठातून बाबा शीलनाथ यांनी दीक्षा ग्रहण केली होती.

फोटो गॅलरीसाठी येथे क्लिक करा ....

WDWD
योगेंद्र शीलनाथ बाबा जयपूरच्या क्षत्रिय घराण्यातील होते. 1839 मध्ये दीक्षा प्राप्त झाल्यानंतर उत्तराखंडच्या जंगलात बाबांनी कठोर तपस्या केली होती. त्यानंतर त्यांनी देशातील निर्जन ठिकाणी भ्रमण केले. पाकिस्तान, अफगाणिस्तान, रूस, चीन, तिबेट आणि कैलाश मानससरोवरामार्गे ते पुन्हा भारतात आले.

काबूलच्या पर्वतावर धुनी पसरविताना त्यांच्यावर अफगाणी लोकांनी हल्ला केला होता. परंतु, त्यांच्या धुनीमुळे अफगाणींच्या तलवारी एकमेकांना लागून तेच जखमी झाले होते. त्यानंतर बाबा काबुलच्या जंगलात गेले आणि तेथे त्यांनी धुनी पसरविली. काबुलवासींनी या चमत्कारामुळे भयभीत होऊन बाबांची क्षमा मागितली होती. अशा प्रकारे बाबांबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात.

1900 मध्ये ते उज्जैनला आल्यानंतर त्यांनी भर्तृहारीच्या गुहेत ध्यान धारणा केली. नंतर काही दिवस ते इंदुरला राहून पुन्हा उज्जैनमध्ये आले. येथूनच त्यांची प्रसिद्धी संपूर्ण मालवा परिसरात झाली. त्यावेळी मालवा प्रांताचे प्रमुख मि. ऑनेस्ट सपत्नीक बाबांचे शिष्य बनले होते. देवासमध्ये पांती-2 चे श्रीमंत महाराज सरकार, केसीएसआय राजसिंहासनावर विराजमान होते. तेही उज्जैन येथे बाबाच्या सत्संग कार्यक्रमात नेहमी जात असत.

एकदा उज्जैनच्या सिंहस्थ कुंभमेळ्यात गुर्जरांनी सर्व संताना घोंगड्याचे वाटप केले. परंतु, बाबा नेहमी नग्न राहत असताना देखील त्यांनाही घोंगडी देण्यात आली. त्यावर बाबाने आपल्याला दिलेली घोंगडी चिमट्याने पकडूनजळत्या धुनीत टाकून दिली. तेव्हा गुर्जरांना हा आपला अपमान वाटला आणि लगेच बाबांनी धुनीत चिमटा फिरवला आणि राखेतून घोंगडी काढून त्यांना परत केली.

तरानामध्ये धुनी पसरवित असताना
WDWD
देवास प्रांत- 1 चे न्यायाधीश बलवंतराव बापूजी बिडवई त्यांना देवासला घेऊन आले. येथील राणीबागेत त्यांच्या धुनीची व्यवस्था करण्यात आली होती. तेव्हा मल्हारराव देखील त्यांच्या दर्शनासाठी येत असत. त्यानंतर मल्हाररावांनी बाबांना आपल्या मल्हार भागात राहण्याचा आग्रह केला होता. येथे बाबा 1901 ते 1921 पर्यंत राहीले. त्यानंतर बाबांनी आपल्या अंतकरणातून निर्णय घेऊन ऋषीकेश येथे चैत्र कृष्‍ण 14 गुरूवार संवत 1977 आणि सन 921 ई. च्या दिवशी पाच वाजून पंचाव्वन्न मिनिटाला समाधी घेतली.