पांढरे कपडे धुण्याची डोकेदुखी आता विसरा

white clothes wash
Last Modified शनिवार, 11 एप्रिल 2020 (15:23 IST)
पांढरे कपडे प्रत्येकाला घालाला आवडतात. कारण पांढरे कपडे घातल्यावर तुमचा लूकच बदलतो. मग ते ऑफिसला जाताना कडक इस्त्रीचा पांढरा शर्ट असो वा तुमच्या मुलाचा युनिफॉर्म किंवा तुमचा आवडता पांढरा कुर्ता. पण प्रश्न असतो ते घातल्यावर जपायचा. कारण ज्या दिवशी आपण पांढरे कपडे घालतो तेव्हा नेमका त्यावर डाग पडतो. मग आठवते तो आईचा ओरडा. पण लग्न झालं असेल तर डाग लागलेले पांढरे कपडे स्वतःच धुवायला लागतात. मोठीच समस्या असते नाही का? एवढंच नाहीतर कधी कधी पांढरे कपडे धुतल्यावर निस्तेजही वाटू लागतात. पण आता नो प्रोब्लेम. तुमच्यासाठी
काही टिप्स. ज्या वापरून तुम्ही पांढरे कपडे धुतल्यास ते राहतील पांढरे शुभ्र. पांढरे कपडे नेही इतर कपड्यांपेक्षा वेगळे ठेवा.
पांढर कपड्यांना लगेच दुसरा रंग लागतो.
त्यामुळे ते इतर कपड्यांपासून वेगळेच ठेवावे.
सर्वात आधी कपडे धुवाला घेतलवर पांढरे कपडे धुवावे. नंतर इतर रंगाचे कपडे धुवावे.
ओव्हर-लोडिंग टाळा
कोणत्याही वॉशिंग मशीनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कपडे धुवायला टाकू नका. असं केल्याने मशीनमध्ये कपडे व्यवस्थित धुतले जात नाहीत. ज्यामुळे कपड्यातील घाण तशीच राहते. पांढरे कपडे धुताना या गोष्टींची काळजी आवर्जून घ्या.
कोमट पाण्याचा वापर
पांढर्‍या रंगाचे कपडे कधीही कोमट पाण्याने धुतल्यास जास्त स्वच्छ निघतात. अशा पाण्याने
कपडे धुतल्याने तेलाचे डाग किंवा कपड्यांची दुर्गंधी लगेच दूर होते.
व्हिनेगरचा वापर
पांढरे कपडे धुतल्यानंतर ते व्हिनेगर घातलेल्या पाण्यात भिजवून ठेवल्याही त्याची दुर्गंधी नाहीशी होते.
बेकिंग सोडा आणि लिंबू
पांढरे कपडे धुताना तुम्ही बेकिंग सोडा आणि लिंबाचा वापरही करू शकता. पांढरा शुभ्र रंग कायम राहण्यासाठी पांढरे कपडे धुण्याआधी ते लिंबाचा रस घातलेल्या पाण्यात भिजवा आणि मग धुवा. तसंच तुम्ही व्हिनेगर आणि बेकिंग सोडा घातलेल्या पाण्याने पांढरे कपडे धुतल्यासही ते पांढरेशुभ्र निघतील.
कपडे तपासा
तुम्ही जर पांढरे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवायला टाकले असतील तर ड्रायरमध्ये सुकवण्याआधी ते एकदा तपासा. जर कपड्यांमध्ये कुठे डाग दिसल्यास ते पुन्हा धुवा. जर डागासकट तसेच कपडे धुतल्यास त्यवरील डाग कायम राहील.
डिटर्जंट
पांढरे कपडे धुण्यासाठी नेहमी योग्य डिटर्जंट पावडर निवडा. याशिवाय कपडे धुताना त्यात योग्य प्रमाणात डिटर्जंट घालणंही आवश्यक आहे. जास्त प्रमाणात डिटर्जंट घातल्यासही कपड्यांवर डाग पडू शकतात. तसंच कपडे निस्तेजही दिसू शकतात.

मग अशाप्रकारे तुम्ही तुमच्या पांढर्‍या कपड्यांची काळजी घेतल्यास त्यावर कधीच डाग पडणार नाहीत आणि ते स्वच्छ पांढरे शुभ्र दिसतील.


यावर अधिक वाचा :

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा ...

अमेरिकेत प्राण्यांना कोरोनाची लागण, एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू
अमेरिकेत सात वर्षीय जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ...

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु

अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याची तयारी सुरु
अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा 5 ऑगस्टला होणार असल्याने कार्यक्रमाची तयार जोरात ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या दोन्ही आरोपींना करोनाची लागण
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुंबईतील दादर येथील राजगृह निवासस्थानाची तोडफोड करणाऱ्या ...

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन

पावसाचे पुण्यात पुन्हा एकदा जोरदार आगमन
महाराष्ट्रात बऱ्यापैकी मॉन्सूनला सुरवात झाली आहे. राज्याच्या बहुतांश भागात गेल्या दोन ...

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार

ऑगस्टमध्ये तब्बल १६ दिवस बॅंक बंद राहणार
ऑगस्ट महिन्यांपासून रक्षाबंधन, गणपती अशा विविध सणांना सुरुवात होते. त्यामुळे ऑगस्टमध्ये ...

मनाच्या लेखणीतून.... जागतिक मैत्री दिवस

मनाच्या लेखणीतून.... जागतिक मैत्री दिवस
मैत्री! दोन अक्षरांचा हा शब्द आणि त्यासाठी दोनच अटी.. No expectations... No ...

शिवाजी महाराजांच्या मैत्रीखातर प्राण पणाला लावणारे तानाजी

शिवाजी महाराजांच्या मैत्रीखातर प्राण पणाला लावणारे तानाजी
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तर आपण ऐकले असेल परंतू त्यांचे बालपणाचे मित्र आणि ...

Monsoon Tips : पावसाळ्यात घराला कीटकांपासून मुक्त ...

Monsoon Tips : पावसाळ्यात घराला कीटकांपासून मुक्त ठेवण्यासाठीच्या खास टिप्स जाणून घेऊ या...
पावसाळा जिथे निसर्गाच सौंदर्य दाखवतं, तसेच पावसाळ्यात घरात कीटकांचा प्रवेश होण्यास ...

मित्र म्हणजे असा घागा..

मित्र म्हणजे असा घागा..
कुठं ही कधीही प्रवेश तिथं, काही लपवता पण येत नाही, काही सांगितल्या शिवाय राहता येत

"नभ भरून हे आले"

"नभ भरून हे आले" नभ भन हे आले मेघ बरसून गेले मन पाखरू होऊन पावसात चिंब झाले