House Flies Home Remedies: घरातील माशांचा त्रास दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा
House Flies Home Remedies: पावसाळ्यात पावसाचा आनंद घेण्यासाठी बहुतेकांना बाल्कनीत बसायचे असते, परंतु पावसाळ्यात सर्वत्र माशा जास्त फिरतात. त्यामुळे या हंगामातील आनंदात विरस होतो. तुमच्यासोबत अनेकदा असे झाले असेल, तर पुढच्या वेळी सीझन एन्जॉय करण्यापूर्वी माशांच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे घरगुती उपाय करायला विसरू नका.
माशांपासून सुटका करण्यासाठी घरगुती उपाय-
1मीठ पाणी-
एका ग्लास पाण्यात 2 चमचे मीठ चांगले मिसळा आणि स्प्रे बाटलीत भरून माशांवर शिंपडा. माशीपासून मुक्त होण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.
2 पुदिना आणि तुळस-
माश्या दूर करण्यासाठी पुदिना आणि तुळस यांची पेस्ट बनवा आणि पाण्यात मिसळून स्प्रे तयार करा आणि माशांवर शिंपडा.हे कीटकनाशकासारखे परिणाम दर्शवते.
3 दूध आणि काळी मिरी-
हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम एका ग्लास दुधात एक चमचा काळी मिरी आणि 3 चमचे साखर मिसळा आणि जिथे माश्या जास्त येतात अशा ठिकाणी ठेवा.माश्या त्याकडे आकर्षित होतील आणि या दुधात बुडून मरतील.
4 व्हीनस फ्लायट्रॅप वनस्पती -
व्हीनस फ्लायट्रॅप ही एक प्रकारची मांसाहारी वनस्पती आहे जी कीटक आणि किडे खातात.हे रोप तुम्ही घराच्या बाहेर किंवा आत कोणत्याही कोपऱ्यात लावू शकता.त्यावर माशी बसताच ती त्यात अडकते.