घरात पाल फिरताना दिसली की किळस वाटते, मनात शंका येते की एखाद्या खाद्य पदार्थात पडून गेली तर... बाजारात पाल मारण्यासाठी अनेक विषारी लिक्विड मिळत असले तरी ते लहान मुलं आणि पाळीव जनावरांसाठीही धोकादायक असतात. अशात पाल पळविण्यासाठी काही घरगुती उपाय करावे. पाहू काही असेच सोपे उपाय: कॉफी पावडर आणि तंबाखू पावडर मिसळून घ्या. याच्या लहान-लहान गोळ्या तयार करून तिथे ठेवा जिथे पाली येतात. हे मिश्रण खाल्ल्यानंतर पाली मरतील किंवा पळून जातील.