रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Updated : शनिवार, 3 डिसेंबर 2022 (19:03 IST)

Parenting Tips: तुमचं मुलं बिघडत आहे का, या लक्षणांनी ओळखा

पालकांना आपल्या मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करायची असते. मुलांच्या आनंदासाठी तो सर्व काही करतो. मुलंही आपल्या आई-वडिलांवर खूप प्रेम करतात आणि त्यांचे म्हणणे ऐकतात. मुलं मोठी झाल्यावर शाळेत किंवा कॉलनीतील मुलांशी मैत्री करतात. आपले मित्र बनवतात. पण बऱ्याच वेळा त्यांना चांगले मित्रांसोबत काही असे माणसे देखील भेटतात ज्यांच्या संपर्कात येऊन मुलं चुकीच्या गोष्टी शिकू लागतात. त्यांच्या वागण्यात बदल होतो. चुकीच्या संगतीमुळे ते लहान वयातच धूम्रपान करू लागतात. त्यांच्या वागण्यात बदल होतो. आपल्या मुलाला नेहमी चांगले शिक्षण मिळावे, त्यांचा सहवास नेहमी चांगल्या माणसांसोबत असावा. असे प्रत्येक पालकाला वाटते. पालकांना नेहमी भीती असते की मुलांची सोबत कशा लोकांशी आहे. ते बिघडणार तर नाही, चुकीचे वागणार तर नाही. आपलं मुलं बिघडत नाही हे या लक्षणांवरून वेळीच ओळखू शकता. जेणे करून मुलं चुकीच्या मार्गावर जाऊ नये. 
 
1 मुलं चुकीची भाषा बोलतात -
मुलांवर आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम लवकर होतो. मुले कधी कधी काही गोष्टी फक्त बघून शिकतात. काहीवेळा ते शिवीगाळ करायला शिकतात. ते चुकीचे शब्द वापरून शिवीगाळ करू लागता. तुम्ही आपल्या मुलाच्या भाषेकडे लक्ष दिले पाहिजे. मुलाच्या बोलण्यात चुकीची भाषा ऐकू येत असल्यास त्याला वेळीच थांबवा. त्याला योग्य आणि चुकीमधील फरक सांगा. आणि ते अशी भाषा कुठून शिकले ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. 
 
2 इतरांना त्रास देणे- 
अनेक मुलांची सवय असते इतरांना त्रास देण्याची. त्यांना दुसऱ्यांना त्रास देण्यात आनंद येतो. असं तुमचं मुलं देखील करत असेल तर समजून घ्या की मुलाचे वागणे योग्य नाही. 
ही सवय सुधारण्यासाठी मुलाला समजावून सांगा की इतरांना त्रास देणे योग्य नाही. जेणे करून तो आपल्या वागण्यात सुधारणा करेल. 
 
3 मुलांची भांडणे -
कुटुंबात मुलांमध्ये भांडणे होत असतात, पण जर मूल अनेकदा आपल्या मोठ्या भावाला आणि बहिणीला मारत असेल किंवा मारहाण करत असेल, तर त्याशिवाय तो दररोज शेजारच्या मुलांशी भांडत असेल, शाळेतुन त्याच्या तक्रारी येत असेल तर अशा परिस्थितीत तुमचं मुलं बिघडत आहे असं समजावं. त्याच्या अशा वागण्यामागील कारण जाणून घ्या आणि त्याला सुधारण्याचा प्रयत्न करा. 
 
4 चोरी करणे -
मुलांना एखाद्याची चांगली गोष्ट पाहून ती घ्यावीशी वाटते आणि तो कळत नकळत चोरी करू लागतो. आपल्या मुलांनी आपल्या मित्राकडून एखादी वस्तू आणली किंवा घरातून वस्तू किंवा पैसे गायब झाले असल्यास त्याची संगत चांगली नाही. आणि तो चोरी करायला शिकत आहे. त्याचा सहवास कोणाशी आहे याचा तपास करा. 
 
5 हट्टीपणा करणे- 
मुलं हट्ट करू लागतात. जर तुमचं मुलं मर्यादेपेक्षा जास्त हट्ट करू लागत असेल आपलं हट्ट पुरवण्यासाठी काही ही करत असेल,उदाहरण -खाणं बंद करणं, रडणे, स्वतःला इजा करणे, या सारख्या गोष्टी करत असल्यास समजावं की मुलाचे वागणे बदलत आहे आणि तो बिघडत आहे. तर वेळीच त्याला समजवावे  आणि त्यासाठी कठोर बनावे.