मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By

Pregnancy Tips : का घ्यावे गर्भवतीने पोषक आहार?

परिस्थिती कशी ही असो तरी गर्भवती स्त्रीने आहार व्यवस्थित घेतला पाहिजे हे आपण ऐकले असेल. त्या मागील कारणंही ठोस आहेत, बघू का आवश्यक आहे गर्भवती स्त्रीला पोषक आहार घेणे:
 
मस्तिष्कासंबंधी विकार
जेव्हा गर्भवती स्त्री योग्य आहार घेत नाही तर अनुचित पोषणामुळे अनेक प्रकाराचे मानसिक आजार होऊ शकतात. काही केसमध्ये आपल्या बाळाच्या पाठीच्या कणाचा विकास असामान्य होतो. काही केसमध्ये सर्व काही सामान्य दिसत परंतू मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेवर प्रभाव पडतो.
 
जन्मावेळी वजन कमी असणे
गर्भावस्थेत उचित आहार न घेतल्यास जन्माच्या वेळी बाळाचे वजन कमी असतं. गंभीर स्थितीत जीवाला धोका असतो.
अपर्याप्त विकास
गर्भवती स्त्रीच्या आहारात व्हिटॅमिन्स आणि इतर आवश्यक पोषक तत्त्व नसल्यास शरीरात संसाधनांच्या कमीमुळे बाळाचा विकास अवरुद्ध होतो.
 
कमी कॅलरी काउंट
योग्य आहार न घेतल्यामुळे प्रीमॅच्योर डेलीव्हरी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अशात बाळाला व्हिटॅमिन्स आणि कॅलरीज मिळत नाही. तर लक्षात असू द्या की पहिल्या ट्राइमिस्टरमध्ये आपल्याला दररोज 2200 कॅलरीज घ्याची आहे, दुसर्‍या ट्राइमिस्टर आणि तिसर्‍या टाइमिस्टरमध्ये ही वाढवून 2300- 2500 कॅलरी सेवन करावी.

दररोज तीनदा आहार घ्या
दररोज तीनदा आहार घेणे आवश्यक आहे.कारण आपले मूल आपल्या शरीराने पोषक तत्त्व घेतो म्हणून आपण आहार टाळाल तर याचा सरळ परिणाम आपल्या बाळाच्या पोषणावर पडेल.
 
कॅल्शियमची कमी हानिकारक
कॅल्शियम आपल्या बाळासाठी अत्यंत आवश्यक आहे. हे योग्य मात्रेत न घेतल्यास बाळ हे तत्त्व आपल्या दात आणि हाडातून घेतं. याने आपल्याला आर्थराइटिस किंवा ऑस्टियोपोरोसिस होण्याची शक्यता असते जे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
 
फॉलिक अॅसिडची कमी
गर्भधारणेच्या प्रारंभिक चरणात फॉलिक अॅसिड आवश्यक असतं कारण याच्या कमीमुळे तंत्रिका ट्यूब विकार होऊ शकतं. अध्ययनाप्रमाणे फॉलिक अॅसिड कमी मात्रेत घेणार्‍या स्त्रियांमध्ये वेळेपूर्वी प्रसवाची शक्यता अधिक असते.