न्यू इयर पार्टीला जात आहात, तर हे वाचा हे 5 टिप्स
नवीन वर्षाचे स्वागत सर्वजण उत्साह आणि आनंदाने करू इच्छित असतात. मस्ती, खाणे-पिणे, डांस हे सर्व सामान्य चलनात आलेले आहे. तरी पार्टीच्या जोश्यात होश गमावणे योग्य नाही. याची किंमत आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला भोगावी लागू शकते. म्हणून येथे आम्ही काही टिपा देत आहोत ज्याने आपली पार्टी आनंदी आणि सुरक्षित साजरी होईल.
1. पार्टीत जाण्यापूर्वीच आपली ड्रिंक घेण्याची एक लिमिट ठरवून घ्या. ओव्हर ड्रिंक्सच्या आहारी जाऊन होश गमावणे योग्य नाही.
2. खाण्यापिण्याच्या बाबतीत सतर्क राहा. जर ड्रिंकचा स्वाद काही वेगळा वाटत असेल ते पिऊ नका. अनहेल्दी फूड घेणे आणि ओव्हरइटिंग करणे टाळा.
3. घरापासून किंवा शहरापासून लांब जात असाल तर जवळीक लोकांना किंवा मित्रांना सांगून जा, कोणत्याही अप्रिय स्थितीत ते आपल्यापर्यंत पोहचू शकतील.
4. आपल्या मोबाइलचे जीपीएस नेहमी ऑन असू द्या ज्याने प्लान बदलले तरी आपली लोकेशन ट्रॅस केली जाऊ शकते.
5. पार्टी एन्जाय करण्यासाठी असते, परंतू मस्ती आणि जोश्यामध्ये वादही निर्माण होतात जे धोकादायक सिद्ध होतात. वाद टाळा आणि कोणत्याही अप्रिय स्थिती दिसल्यास नातेवाइकांना आणि पोलिसांना सूचित करा.