शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सप्तरंग
Written By
Last Modified: सोमवार, 19 जून 2023 (19:17 IST)

पावसाळ्यात कपडे स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी हे करा

clothes clean and foul free
सध्या सगळीकडेच पावसाचे वातावरण झाले आहे. पण त्यामुळे आपली कामे काही थांबत नाहीत. अगदी शाळेमध्ये जाणार्‍या चिमुरड्यांपासून, ते काही ना काही कामानिमित्त घराबाहेर पडणार्‍या मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पावसाला तोंड द्यावे लागत आहे. पावसाच्या हलक्या सरी असोत, किंवा धोधो कोसळणारा पाऊस असो, आपण पाऊस थांबण्याची वाट न पाहता, रस्त्यातील खड्डे, पावसाचे साचलेले पाणी, चिखल, ह्यांना तोंड देत आपापल्या कामांमध्ये गुंतत असतो. हे कपडे स्वच्छ धुणे, ही एक कसरतच असते. त्यातून हवा ओलसर, दमट असल्याने आणि ह्या दिवसांमध्ये उन्हाने दडी मारल्याने, धुतलेले कपडे सुकणे हाही मोठाच प्रश्र्न असतो. त्यातून जर कपडा जाडसर असेल आणि तो व्यवस्थित सुकला नसेल तर कपडा स्वच्छ धुतलेला असूनही त्यातून एक प्रकारची कुबट दुर्गंधी येऊ लागते. थोडक्यात सांगायचे तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कपडे स्वच्छ धुणे आणि ते दुर्गंधीमुक्त ठेवणे हे जरा अवघड काम होऊन जाते. तसेच कपाटातल्या कोरड्या कपड्यांनाही हा वास येऊ लागतो. हे टाळण्यासाठी काही सोप्या उपायांचा अवलंब करता येईल.
 
कपाटामध्ये असलेल्या भरजरी साड्या किंवा अन्य किमती कपडे दमट हवेमुळे येणार्‍या दुर्गंधीपासून मुक्त राहावेत ह्यासाठी ह्या कपड्यांना साडी बॅग्जमध्ये व्यवस्थित ठेवणे हा चांगला पर्याय आहे. तसेच अधून मधून हे कपडे कपाटाबाहेर काढून त्यांना थोड्या खुल्या हवेवर राहू द्यावे. त्यामुळे ह्या कपड्यांमध्ये असणारा थोडाफार दमटपणाही निघून जाण्यास मदत होईल. तसेच कपाटाची दारेही काही वेळ खुली राहू देत त्यामध्ये हवा खेळू द्यावी. कपाटामध्ये आणि आपण आपल्या कपडे ठेवतो त्या स्टोरेज बॅग्ज मध्ये डांबराच्या गोळ्या असाव्यात.