1. वृत्त-जगत
  2. अर्थजगत
  3. शेअर बाजार
Written By wd|
Last Modified: मुंबई , सोमवार, 7 जुलै 2014 (17:40 IST)

सेंसेक्सने पार केला 26 हजारचा आकडा

शेअर बाजाराच्या निर्देशाकांने सोमवारी पहिल्यांदा 26 हजारांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला. तसेच नॅशनल स्टाक एक्सचेंज अर्थात निफ्टीने 7,787.95 अंकांचा उच्चांक गाठला आहे. बाजार उघडताच सकाळी सेंसेक्स 137.29 अंकांनी उसळून 26,099.35 अंकावर स्थीर झाला. तसेच निफ्टीच्या सेंसक्समध्ये 36.35 अंकांची वाढ दिसून आली. निफ्टीने  7,787.95 अंकाची रेकॉर्डब्रेक उच्चांक गाठला.

शेअर मार्केटवर अजूनही मोदी जादू कायम आहे. मोदी सरकारचे पहिले अधिवेशन सुरु झाले आहे. त्याचा बाजारावर सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.