गुरूवार, 23 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. शेअर बाजार
Written By
Last Modified: बुधवार, 25 ऑक्टोबर 2017 (16:26 IST)

शेअर बाजारात प्रचंड उत्साह, निफ्टी १०,३०० वर

share market

सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी सुरू केलेल्या घोषणेने शेअर बाजारात प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. तब्बल ४५० अंकांनी निर्देशांक वधारला आणि ३३,०८६ वर पोहोचला. निफ्टीनेही १०,३०० अंक पार करत नवा विक्रम केलाय. 

वाढत्या बुडीत कर्जाचा तिमाहीतील नफ्यावर विपरीत परिणामांची नोंद करणाऱ्या देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकरिता केंद्र सरकारने घसघशीत अर्थसाहाय्य देऊ केलेय. याअंतर्गत बँकांना येत्या दोन वर्षांकरिता २.११ लाख कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. केंद्र सरकारने मंगळवारी घेतलेल्या निर्णयामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कर्जपुरवठा क्षमता आता भक्कम होईल, असा दावा करण्यात आलाय. त्यामुळे याचा परिणामही दिसून येत आहे. बँकिंग क्षेत्रातील निफ्टी २.३ टक्क्यांनी वाढून २४,७८० स्तरावर गेला. निफ्टीचा पीएसयू बँक इंडेक्स २२ टक्क्यांसह मजबूत आहे.