Indore : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 350 वा वर्धापन वर्षाच्या निमित्ताने भव्य युवा कीर्तन महोत्सव
स्वजन हो,
गत वर्षी प्रमाणे यंदा ही राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. प्रा. स्व. न. चिं. अपामार्जने बुआ ह्यांच्या स्मरणार्थ आणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा 350 वा वर्धापन वर्षाच्या निमित्ताने दिनांक 5,6,7,8 ऑक्टोबर 2023 रोजी भव्य युवा कीर्तन महोत्सव श्री समर्थ मठ संस्थान,पंत वैद्य कॉलोनी रामबाग इंदूर येथे करण्याचे योजिले आहे,
महाराष्ट्रातील नामवंत युवा कीर्तनकार ह्या महोत्सवात आपल्या भेटीस येणार आहेत. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सर्व युवा कार्यकर्त्यांना आशीर्वाद द्यावे.
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात
कोटी अन्न संतर्पण पुरे एकची कीर्तन
त्या मुळे पितृपक्षात जसे अन्नदान महत्वाचे तसेच वैचारिक यज्ञात सहभाग सुद्धा पुण्यप्रद आहे. त्या मुळे ह्या धर्मिक आणि राष्ट्रीय यज्ञात सहाय्य करुन आम्हास उपकृत करावे आणि पितृपक्षात कीर्तनासाठी दान देऊन पुण्य प्राप्त करावे.