बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कथा
Written By
Last Modified: शनिवार, 7 मे 2022 (15:53 IST)

प्रेमाचा जिव्हाळा

प्रेमाचा जिव्हाळा
 
एक डॉक्टरांकडे एक ८०-८५ वर्षाचे म्हातारे गृहस्थ आपल्या जखमेचे टाके काढून घ्यायला गेले. सकाळी ८.३० वाजण्याचा  सुमार. ते डॉक्टरांना म्हणाले थोड लवकर होईल का काम ? मला ९ वाजता एकीकडे जायचे आहे. डॉक्टरां समोर त्या क्षणी काहीच काम नव्हतं.

त्यांनी जखम तपासली सामानाची जमवा जमाव केली आणि टाके काढायच्या तयारी करण्या दरम्यान ते त्या गृहस्थांशी गप्पा मारत होते. "आजोबा ९ वाजता दुसऱ्या डॉ. कडे जायचं आहे का..?"
 
"नाही मला ९ वाजता माझ्या बायकोबरोबर नाश्ता करायला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जायचं आहे."
 
"हॉस्पिटल मध्ये....? आजारी आहेत का त्या...?"
 
"हो ! गेली पाच वर्षे हॉस्पिटल मधेच आहे..ती.."
 
"अच्छा ! आणि तुम्ही वेळेवर गेला नाहीत तर वाट पाहतील नं त्या..?अन् काळजीही करतील नां ? होय ना बाबा "
 
"नाही डॉक्टर.... तिला अल्झायमर्स झालाय. ती गेली पाच वर्षे कोणालाच ओळखत नाही." आजोबा शांतपणे म्हणाले. 
 
डॉक्टर चकित होऊन म्हणाले, "आणि तरीही तुम्ही रोज त्यांच्याबरोबर नाश्ता करायला इतक्या वेळेवर आणि धडपडून जाता....? अन् चक्क त्या तुम्हाला ओळखतही नसताना..?"
 
त्यावर तितक्याच शांतपणे आजोबा म्हणाले...."डॉक्टर...ती मला ओळखत नसली तरी मी तिला गेली कित्तेक वर्षे ओळखतो. माझी बायको आहे ती ..आणि माझं जीवापाड प्रेम आहे तिच्यावर.....डॉक्टर...ती आजारी झाल्यापासून तीला सोडुन अन्नाचा कणही घेत नाही मी माझ्या जीवनपथावरील सुखदुःखाच्या क्षणांची खंबीर आणि लाडकी सोबतीण आहे हो ती ..... "
 
ऐकता ऐकता डॉक्टरांच्या अंगावर रोमांच उभे राहिले...गळा दाटून आला....त्यांच्या मनात आलं ...."हे खर प्रेम. प्रेम म्हणजे काही नुसत घेणं नव्हे, तर त्या बरोबर काहीतरी देणं... निरपेक्ष पणे स्वतःकडचा आनंद उधळणं त्या गृहस्था सारखं... म्हातारबाबांचे काम झाले अन् " येतो डॉक्टरसाहेब " म्हणून लगबगीने निघुनही गेले ... आणि..डॉक्टरांनाचं नाहीतर जगाला एक संदेश नकळत देवुन गेले ...
 
`चांगल्या लोकांच्या वाट्याला नेहमीच सगळं सर्वोत्तम येत असं नाही, पण जे वाट्याला येत त्यातलं सर्वोत्तम शोधून ते आयुष्य साजरं करतात. यालाच आयुष्य म्हणायचं. आपल्या माणसाला आहे तसं  स्विकारणं आणि आपल्या दोन्ही हातांनी आपल्या सर्वस्वाने त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करणं.. 
हीच जीवनाची परिपुर्ण सार्थकता आहे...
 
- सोशल मीडिया