"पेपरटाक्या "

Last Updated: बुधवार, 15 जून 2022 (16:59 IST)
ओ भैया लोकमत समाचार है क्या ?" चाळीशीतला ऊंच, साधारण बांधा असलेला व फार मोठे पोट असलेला, अंगावर टी शर्ट व लुंगी घातलेला व्यक्ती दात घासत घासत घराच्या भिंतीवरून डोकावत म्हणाला.बिना रंगाची गंजलेली सायकलचे ब्रेक दाबून खर-खर आवाज करीत सायकल थांबवून स्टॅन्ड लावत लावत एक युवक म्हणाला, "है ना भैया! ये लो" भिंतीवरुनच पेपर त्या माणसाला देत म्हणाला. "ठीक है
रुक जरा पैसे लेके आता हुं", अस म्हणून लुंगीवाला माणूस घरात गेला. तितक्यात माॅर्निंग वाॅकला गेलेले गजभिये सर पेपरवाल्याजवळ येऊन थांबले व नॅपकीनने घाम पुसत म्हणाले, ''अरे राम्या बरं झालं ईथंच भेटलास...दे बरं माझे पेपर."
'व्हय सर'' तो पेपरवाला राम्या आदराने म्हणाला व सायकलीला बांधलेल्या गठ्ठ्यातून एक मराठी व एक ईंग्रजी पेपर काढून देऊ लागला.

तो लुंगीवाला आला व त्याने 10 रु. ची नोट राम्याच्या हातात दिली. गजभिये सर लुंगीवाल्याला म्हणाले, "Good morning पाटील साहेब." ''Good morning गजभिये सर.

"काय आज हिंदी वृत्तपत्र ?" "हो सर, ते काल भारताने अंतराळात यान सोडलयं त्याच्या माहितीचा लेख आलाय लोकमत समाचार मध्ये." लुंगी घातलेले पाटील साहेब गजभिये सरांच्या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाले.राम्या खाकी पॅन्टच्या खिश्यात सुट्टे पैसे शोधत होता. तितक्यात म्हणाला, ''हा साहेब, ते ब्रम्होस व्हय. ते भारत आणि रशियाने पाठवलंय. भारताची नदी हायना ब्रम्हा आणि रशियाची नदी ओक्सावा त्यामुळं त्याला ब्रम्होस नाव दिलंय, आपल्याला सगळं म्हाहीत हाय." खेडवळ भाषेत राम्या म्हणाला.


गजभिये सर व पाटील साहेब आश्चर्याच्या प्रतिक्रीया देत म्हणाले, "अरे व्वा! हुशार आहेस तू."

पुढे गजभिये सर म्हणाले, ''UPSC ला पडणारा प्रश्न आहे हा. UPSC चा क्लास चालवतो की काय !'' पाटील साहेब व गजभिये सर हसत हासत निघून गेले.

तितक्यात राम्या म्हणाला, '' सर ह्या महीन्याच बिल राहलंय तुमचं."

गजभिये सर मागे न वळता म्हणाले, ''उद्या सकाळी दहाला क्लासवर येऊन जा देतो पैसे."

सायकलचा स्टॅन्ड काढला व राम्या निघाला पुढे आपल्या कामाला.

दुस-या दिवशी सकाळी पेपर टाकून झाल्यावर 10 वाजता राम्याची सायकल गजभिये स्पर्धा-परीक्षा ॲकॅडमी असे लिहिलेल्या बोर्डसमोर येऊन थांबली.
दुस-या मजल्या वरच्या
बाल्कनीत बसलेल्या सरांकडे बघून राम्या म्हणाला, ''सर ते बिल..''

काही न बोलताच गजभिये सरांनी हातवारे करुन त्याला वर येण्यास सांगितले.
क्लासच्या ऑफीसची बेल वाजली. गजभिये सरांनी दरवाजा उघडला व मळलेला टी-शर्ट व खाकी गणवेशाची पॅन्ट, सावळा चेहरा व 15-16 वर्षाचा सडपातळ राम्या हातात बिल बुक व पेन घेऊन उभा होता.

"ये आत, ये बस इथं, मी पैसे घेऊन येतो" राम्याच्या हातातले बिल बुक घेत सर म्हणाले व आत गेले.

राम्या लाकडी खुर्चीवर uncomfortably बसून इकडे तिकडे पाहू लागला. समोरच्या लाकडी टेबलवर काही प्रश्नपत्रिका होत्या, त्यातली एक राम्याने उचलून पाहिली व पटकन बिलच्या मागे काहीतरी लिहू लागला. पाच मिनटांनी सर आले व पैसे देत म्हणाले, "काय लिहीत होतास रे ?"
''सर ते हे ऊत्तर बरोबर हायत का बघा ना '' राम्या म्हणाला.
सरांनी पाहीले, त्यात 8 बुद्धीमत्तेचे प्रश्न सोडवले होते तेही अवघ्या 4 ते 5 मिनीटात. सर अचंबित झाले व म्हणाले, "अरे कसं सोडवलं तु हे ? आणि एवढ्या कमी वेळात ? UPSC ला हे प्रश्न सोडवायला 10 ते 12 मिनीट लागतात. कसं केलंस तु हे ? कुठे शिकलास."

त्यावर राम्या म्हणाला, '' सर मला दहावीत 92 टक्के हायत. बाप न्हाय मला. आय धुनी-भांडी करतेआणी म्या सकाळी पेपर टाकतो. नंतर एका reading room वर वाॅचमन हाय लोकांच्या चपली व गाड्यावर लक्ष ठेवतो. यवढं करुन दोन टायमच खायला भेटतं. सकाळी पेपर वाचून व नंतर reading वर लोकांनी टाकून दिलेल्या नोट्स, कागद, कधी कोणाकडं आय कार्ड नसलं तर त्याचं पुस्तक घेतो वाचायला थोडावेळ व मधी सोडतो गपचुप. मला बी अधिकारी व्हायचंय पण आय म्हणते पैसं न्हायतं शिकायला. ''त्याचे उत्तर ऐकून मात्र सर नि:शब्द झाले. काहीच बोलले नाहीत. त्याच्या हातात पैसे दिले व राम्या निघून गेला.

दोन दिवसानी राम्या गजभिये सरांच्या क्लाससमोर सायकल लावून समोरच्या बिल्डींगमध्ये बिले गोळा करण्यासाठी गेला व 15-20 मिनीटांनी परत आला. सायकलीच्या ब्रेकला एक जड पिशवी होती. राम्याने ती उघडून बघितली त्यात गणवेश, काही पुस्तके, पैसे होते व तळाला एक चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं, "ह्यात कॉलेजचा गणवेश आहे व पुस्तके आहेत जवळच्या जनता महाविद्यालयात Arts ला तुझा प्रवेश घेऊन ठेवलाय. सोमवार पासून कॉलेजला जायचं. अभ्यास करायचा. अधिकारी व्हायचंय ना तुला. वेळोवेळी तुला पुस्तके भेटतील. फक्त पेपर टाकणे चालू ठेवायचं. "खाली लिहिलं होतं,"मायबापांनी सगळ्या सुविधा पुरवलेला पण कधीच UPSC पास न झालेला अपयशी...."

अशीच पुस्तके राम्याला भेटत राहिली. व 6 वर्षानंतर गजभिये सर एके दिवशी पहाटे मॉर्निंग वॉक वरुन परतले तेव्हा दारासमोर एक पिशवी होती. त्यात काही मेडल्स व प्रमाणपत्रे होती. तळाला एक चिठ्ठी होती त्यात लिहिलं होतं, "ज्याने एका पेपरटाक्याला IAS केलं तो अपयशी कसा ? तो तर जगातला सर्वात यशस्वी व श्रीमंत माणूस.....!!"

आपल्याकडे दुस-याला देण्यासारखे असे खूप कांही असते, आपली दुस-याला मदत करण्याची ऐपत देखील असते...पण हवा असतो केवळ
मनाचा मोठेपणा व देण्याची वृत्ती व तीही योग्य मनुष्य ओळखून.

तो सुज्ञपणा व औदार्य आपल्या प्रत्येकामध्ये वाढीस लागो व वृद्धींगत होवो...आपल्या आजूबाजूला खूप राम्या आहेत...गरज आहेत ती गजभिये सरांची...

साभार-सोशल मीडिया


यावर अधिक वाचा :

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी

हुपरीत आढळली एलियन्ससारखी दिसणारी अळी
निसर्ग आपल्या अचंबित करणार्‍या आविष्कारांनी मानवाला नेहमीच विचार करावयास लावतो. संपूर्ण ...

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला

Video विमानाखाली कार घुसली, IGI विमानतळावर मोठा अपघात टळला
नवी दिल्ली- राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात ...

पनवेलमध्ये मनसेला खिंडार, 100 पदाधिकाऱ्याचा शिंदे गटात प्रवेश
शिवसेनेनंतर शिंदे गटाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मनसेला खिंडार पाडले आहे. शिंदे ...

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे

संजय राऊत यांच्या मुंबईतील दोन ठिकाणी छापे
शिवसेना खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केल्यानंतर त्यांच्या संबंधित ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र ...

सुप्रिया सुळे म्हणतात आम्ही सर्व कुटुंब या लढ्यामध्ये एकत्र आहोत
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली. राष्ट्रवादी पक्षाचे ...

Weight Loss: कोणते पेय वजन कमी करण्यासाठी खूप प्रसिद्ध ...

Weight Loss: कोणते पेय वजन कमी करण्यासाठी खूप प्रसिद्ध आहेत? करा आहारात समाविष्ट
वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती समोर येतात.यातील काही उपवासाशी संबंधित आहेत तर काही ...

Career In Cinematography: सिनेमॅटोग्राफीमध्ये करिअर कसे ...

Career In Cinematography:  सिनेमॅटोग्राफीमध्ये करिअर कसे करावे,व्याप्ती ,पगार ,पात्रता जाणून घ्या
Career In Cinematography: कॅमेराची आवड आणि कलात्मक आणि दूरदर्शी वृत्ती असल्यास ...

Janmashtami Special Panjriri Recipe : जन्माष्टमीला ...

Janmashtami Special Panjriri Recipe : जन्माष्टमीला नैवेद्यासाठी पंजीरी बनवा, साहित्य आणि कृती जाणून या
जन्माष्टमीला आपल्या लाडक्या गोपाळ कृष्णासाठी बनवा पंजिरी चला तर मग साहित्य आणि कृती जाणून ...

राधाकृष्णाच्या प्रेमाच्या अनोख्या गोष्टी

राधाकृष्णाच्या प्रेमाच्या अनोख्या गोष्टी
भगवान श्रीकृष्ण आणि राधा यांचे नाते सामान्यतः पती-पत्नी नव्हे तर प्रियकर-प्रेयसी म्हणून ...

Intelligence Bureau Recruitment 2022 : देशाच्या गुप्तचर ...

Intelligence Bureau Recruitment 2022 : देशाच्या गुप्तचर विभागात IB येथे 766 पदांसाठी भरती अर्ज करा
IB Recruitment 2022 Notification: इंटेलिजेंस ब्युरो (IB) ने सहाय्यक केंद्रीय गुप्तचर ...