शनिवार, 7 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कथा
Written By वेबदुनिया|

बीज

- प्रकाश दांडेकर

बीज कथा कविता गोष्ट साहित्य
ND
वैशाख महिन्यातले रणणते ऊन चहूकडे पसरले होते. दुपारी दोन वाजले असावेत. वैशाख मासात त्या उन्हाळ्यामुळे भयंकर होणाऱ्या उकाड्यामुळे संपूर्ण रस्त्यावर सामसूम दिसत होती. शहरापासून आठ कोसावर असलेल्या ओंकारेश्वर स्मशानघाटावरच्या धर्मशाळेच्या परिसरातसुद्धा सुकशुकाटच होते.

मधून-मधून काही कुत्रांच्या भांडणाचे व भोकण्याचे आवाज येत होते. मधूनच कोणी कुत्र्याच्या रडणे वातावरणालआणखीनच भेसूर बनावीत होत. अशा वातावरणामध्ये तिथे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये काही लोकांच्या बोलण्याची आवाज येत होते. ते बहुतेक चार
माणसं असावेत.

आज तिथे दिवाकर आपल्या नुकत्याच दिवंगत झालेली पत्नी अर्चनाच्या बाराव्याची विधी करण्याकरिता आपले मोठे बंधू सुधाकर, आई शांता अक्का व मामा तात्या जोशी यांच्याबरोबर आला होता. सर्व लोक बाराव्याची विधी संपन्न करविणारे पितळे गुरुजींची वाट बघत होते.

गुरुजी अध्याप आलेले नव्हते पण त्यांचे सहायक नारायण गुरुजींनी पिंड वगैरे तयार करून व जौ, तीळ व दुसऱ्या जरूरी सामुग्रीची तयारी देखील करून ठेवली होती. वाट होती तर फक्त पितळे गुरुजींची, कारण ते आल्यानंतरच सर्व विधी सुरू होणार होत्या. वेळ जाण्यासाठी उपस्थित मंडळींमध्ये आपसात बोलणी सुरू झाली.

दिवाकर म्हणाला - ''गुरुजी अद्याप आलेले नाही न जाणे कुठे अडकले आहेत, केव्हा इथल्या विधी होतील आणि घरी जाता येईल कारण या उन्हानेतर जीवच नकोसा झाला आहे. तेवढ्यात शांता अक्का म्हणाल्या - हो मलापण वाट पाहून अगदी वैतागच आला आहे, कोण जाणे केव्हा हे गुरुजी येथे तडफडतील अशा ठिकाणी काय कधी बायका येतात? मी म्हणून आले की माझ्या दिवाकरची बायको गेल्यामुळे त्याचा संसार असा उघड्यावर पडलेला आहे! गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये असं म्हणतात पण त्या टवळीला असं काय झालं की तिने स्वत:ला आग लावून पेटवून घेतले. पोलिसाच एक लचाड माझ्या मागे अजून आहेच. लोकांना वाटत की मी
तिला जाळून मारले पण त्या कर्मदरिद्रीच्या मूर्खपणामुळेच माझ्या दिवाकरचा संसार उध्वस्त झाला. माझा पोर अगदीच एकटा पडला हो, असं म्हणून शांता अक्कांनी चक्क हंबरडाच फोडला.

तितक्यात दिवाकरने तिला डरवले व म्हणाला - आई आता शांत राहा, ही काय वेळ आहे असल्या गोष्टी करण्याची, बघ आता गुरुजी पण आलेले आहे सर्व काही रीतसर होईल. पितळे गुरुजी येऊन गेले होते. सर्व तयारी लागलेलीच होती. त्यांनी रीतसर विधी सुरू केली. एक दोन तास उलटल्यानंतर सर्वात महत्त्वाची विधी म्हणजे पिंडदानाला सुरुवात झाली पण काही केल्या कावळे ठेवलेल्या पिंडाकडे फिरकत ही नव्हते.

गुरुजी म्हणाले - ' मृत आत्मेच्या शांतीसाठी कोणाला काही सांगायचे असेल तर सांगा म्हणजे गेलेल्या व्यक्तीचा आत्मा मुक्त होईल व आपलीपण सुटका होईल. पहिल्यांदा अर्चनाचा दीर सुधाकर पिंडा जवळ गेला व म्हणाला 'अर्चना तू काही काळजी करू नको मी दिवाकरच पूर्ण लक्ष ठेवेन त्याला कधीच काही कमी पडू देणार नाही.

सुधाकरच्या इतक्या म्हटल्यानंतरपण पिंडाजवळ काहीच हालचाल झाली नाही. आता शांता अक्का पुढे आल्या व म्हणाल्या - सूनबाई तू निश्चित राहा मी तुझ्यानंतर दिवाकरला कधीच एकटे पडू देणार नाही त्याच पुन्हा लग्न लावून त्याचं घर व्यवस्थित लावून देईन, त्याचा संसार उघड्यावर पडू देणार नाही. शांता अक्काच्या हे म्हटल्यानंतर देखील कोणी कावळा पिंडाकडे फिरकत नव्हता.

आता गुरुजीपण कंटाळले होते ते म्हणाले - मृत व्यक्तीचा आत्मा अतृप्त वाटतोय. त्याची काही अंतिम इच्छा असेल तर ते पूर्ण करण्याच वचन द्या तेव्हाच मृतात्मा मुक्त होईल व त्याला शांती लाभेल. तितक्यात दिवाकरला आपले प्राण सोडण्यापूर्वी अर्चनाचे शेवटचे शब्द आठवले. अर्चना म्हणाली होती - मी गेल्यानंतर पत्र सासूबाईंना वाचायला द्या व त्या प्रमाणेच वागा हीच माझी शेवटची इच्छा आहे. तेव्हा दिवाकरने तिचा हात हातामध्ये घेऊन वचन दिले होते तुझी शेवटची इच्छा मी प्राणपणाने पूर्ण करेन तू निश्चिंत राहा.
आता दिवाकर पुढे म्हणाला 'अर्चना मी तुझी शेवटची इच्छा जरूर पूर्ण करेन हे माझे वचन आहे. '' दिवाकरने इतके म्हटलं आणि चमत्कार झाल्याप्रमाणे एक कावळा अचानक पिंडाजवळ आला आणि पिंडाला चोचीत घेऊन आकाशाकडे नाहीसा झाला.

सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला की चला अर्चनाला मुक्ती मिळाली आणि तिची आत्मा मुक्त झाली, पण दिवाकरचा चेहरा गंभीर झाला होता तो विचार करीत होता ते पत्र काय असेल, त्या पत्रात असं काय होत ज्याची र्पूतता न होण्याच्या हमीमुळे अर्चनाचा आत्मा मुक्त होत नव्हता. दिवाकर घरी गेला व त्याने लगेच पेटीमध्ये ठेवलेले अर्चनाचे पहिले आणि शेवटचे पत्र शांता अक्कांच्या हातात दिले. शांता अक्का ने ते पत्र थरथरत्या हाताने दिवाकरच्या हातात दिलं. दिवाकरने पत्र वाचण्यास सुरू केले.

''सासूबाई हे पत्र मी तुम्हाला आपल्या मनातील काही सांगण्यासाठी लिहीत आहे. तुम्ही मला आपल्या माझ्याहून दहा वर्ष अधिक वयाच्या मुलाच्या शंकाखोर स्वभावाची व त्याच्या वयाची कल्पना न देता आपल्या श्रीमंतीच डोल दाखवून व माझ्या गरीब बापाकडून हुंडा न घेण्याचा आमिष दाखवून मला तुमच्या घरी सून म्हणून आणले पण लग्न झाल्यानंतरच मला कळले की माझी कशी फसवणूक झाली आहे. तुमचा मुलगा दिवाकर सारख्या शंकेखोर मनुष्या बरोबर संसार करणे म्हणजे शिक्षाच होती व ही माझ्या बापाच्या गरिबीमुळे माझ्या वाट्याला आली होती. तुमचा मुलगा माझ्याकडे नेहमी शंकेनेच बघायचा. मी कोणाशी बोलते, कोण माझ्याशी जवळीक साधत आहे. माझ्याकडे त्याचं बारीक लक्ष असायचं. तो नेहमी माझ्याकडे लँडलाईन व मोबाईलवर येणारे सर्व फोन ट्रेस करायचा, आणि यामध्ये कुणी पुरुषाचा नंबर असला तर त्याला वाटायचं की त्याच्याशी माझं काही संबंध आहे का?

मी साध दूध घ्यायला दूधवाल्या जवळ जायची व त्याच दूध पातळ येत हे हसून तक्रार करायची, कारण आपण सारखं कोणाशी भांडू शकत नाही न? पण त्यांना वाटायचं की तो माझ्यावर लाइन मारतं आहे व मी पण त्याच्यावर फिदा आहे. समोर राहणाऱ्या राहुलशी माझे खूप पटायचे कारण तो आणि मी एका वयाचेच होतो व कॉलेजमध्ये ही एक वर्ष बरोबर शिकलो होतो. पण मी त्याच्याशी जरा ही बोलले तर ते मला रागावायचे व म्हणायचे की तो तुला इतका आवडतोना मग राहा त्याच्या घरी त्याची रखेल म्हणून. मला त्यांच्या अशा वागणुकीमुळे तिटकारा यायचा पण काही इलाज नव्हता.

मला इतकं नजरकैदेत ठेवून रात्री त्यातील पुरुष जागा व्हायचा व तो माझ्यावर राक्षसासारखा तुटून पडायचा, माझ्या शरीराचे लचके तोडायचा. माझा पूर्ण उपभोग घ्यायचा व सकाळी पुन्हा मला घरातील केरसुणी समजून हीच चिडचिड आरडा ओरड सुरू करायचा. मला वाटायचे की आपण काय पशू आहोत? कारण त्यांचा मालकपण दूध काढताना त्यांना हळुवारपणे जपतो पण माझा नवरा रात्री पशू बनून माझा उपभोग करतो आणि सकाळी मला खेटर मारतो. मला तर या नारकय जीवनाचा कंटाळाच आला आहे.

माझे दीर तुमचा मोठा मुलगा सुधाकर ज्याला मी आपल्या मोठ्या भावाप्रमाणे समजत होते तो ही माझ्याकडे वाईट नजरेने बघायचा. केर काढताना कधी कधी माझा पदर सरकून जायचा तेव्हा त्याच लक्ष माझ्या सरकलेल्या पदराकडेच असायचे. मी याबद्दल तुम्हाला सांगितले देखील होते तर तुम्हीच माझ्यावर उलटल्या व म्हणाल्या ''चल चवचाल मेली माझ्या गुणी पोरावर लांच्छन लावते. ''

मी आपली कथा कुणास सांगावी? एका दिवशी नियतीने आपलं स्वरूप दाखवला मला कळलं की मला दिवस गेलेले होते. मला वाटलं की ही गोष्ट जेव्हा मी आपल्या नवऱ्याला सांगीन तर ते आनंदाने वेडे होतील कारण माझ्यापोटात तुमच्या वंशाच वीज होते पण ही गोष्ट ऐकल्यावर त्याचा चेहरा एकदम कावरा-बावरा झाला व तो म्हणाला ''साली तू कुठे शेष खाऊन आली आहे व त्याच पाप माझ्या डोक्यावर मारीत आहे, जरूर ही ती तुझ्या त्या राहुलचीच कारस्थानी आहे कारण मी तर सतत बाहेरगावीच असायचो आणि कधी मी तुझ्या जवळ आलो तर तू नेहमी थकलेलीच असायची, म्हणून ह्यपापाला पाडून टाक, याला मी कधीपण बाप म्हणून स्वीकार करणार नाही.''

अशा प्रकारे त्यांनी माझ्या चारित्र्यावर लांच्छन लावले व आपल्या स्वत:च्या बीजावर शंका केली आहे. सासूबाई तुम्हीपस्त्री आहात व तुम्हाला माहीत आहे की एका स्त्रीलाच माहीत असतं की तिच्यात असणारे बीज कुणाचे आहे. आता मला हे सर्व असाहाय्य झालेले आहे आता हे बीज इथेच नष्ट झाले पाहिजे कारण या बीजापासून निर्माण झालेला मुलगा पण बापा सारखाच शंकेखोर निघेल व तो पुन्हा कोणी माझ्या सारख्या निरपराध मुलीचा बळी घेईल म्हणून मी हे सर्व इथेच थांबवत आहे व स्वत:ला पेटवून आपल्या जीवाचा शेवट करीत आहे. माझी अंतिम इच्छा हीच आहे की माझ्यानंतर आपल्या मुलादुसरं लग्न लावून एका अजून निरपराध मुलीच आयुष्य खराब करू नका.

तुमची अर्चन