बुधवार, 18 फेब्रुवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. मराठी साहित्य
  4. »
  5. मराठी कथा
Written By वेबदुनिया|

शुभ चेहरा

- कुसुम जैन

शुभ चेहरा
ND
तो कसाबसा बारावी पास झाला आणि महत्प्रयासाने त्याला एका इंजिनियरींग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. पण दोन वर्षे एका सत्राची परीक्षा देण्यातच गेली. पण पास काही होत नव्हता. पुन्हा एकदा परीक्षा आली, तेव्हा आई त्याच्या हातावर दही देत म्हणाली,

'थांब जरा. आधी कुण्या चांगल्या माणसाचं तोंड बघ. मगच परीक्षेला जा.'
आतल्या खोलीत त्याच्या दोन बहिणी हे ऐकत होत्या. त्यातली एक एमसीए करून एका बड्या कंपनीत काम करीत होती, तर दुसरी एमबीए करत होती. त्या दोघींच्या एकमेकांशी गप्पा सुरू झाल्या.

'वर्षभर पुस्तकांचं तोंड जरी पाहिलं असतं तरी कुण्या चांगल्या माणसाचं तोंड पहायची वेळ आली नसती'.