बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 डिसेंबर 2024 (08:00 IST)

Winter Special Sweet Recipe: गाजर बर्फी

Gajar barfi
साहित्य-
गाजर किसलेले 1 किलो
खवा मावा- 250 ग्रॅम
साखर- 200 ग्रॅम  
तूप- 2 चमचे
वेलची पूड  
बदाम, काजू, पिस्ता 
दूध- 1 कप
 
कृती-
सर्वात आधी एका पातेल्यात तूप टाकून हलके गरम करावे. त्यात किसलेले गाजर घालून मंद आचेवर परतवून घ्यावे. गाजर मऊ होईपर्यंत आणि पाणी कोरडे होईपर्यंत सुमारे 10-15 मिनिटे शिजवून घ्यावे. आता यामध्ये दूध घालावे. व ढवळत राहावे जेणेकरून दूध गाजरात चांगले मिसळून घट्ट होईल. दूध पूर्णपणे आटल्यानंतर त्यात खवा आणि साखर घालावी. आता साखर विरघल्यानंतर आता या मिश्रणात वेलची पूड आणि ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करावे. आता एका प्लेटला तूप लावून घ्यावे. व हे मिश्रण  सारखे पारवे. आता वरून परत ड्रायफ्रुट्सने सजवावे. आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर सुरीने वड्या कापून घ्याव्या. तर चला तयार आहे आपली हिवाळा विशेष गाजराची बर्फी रेसिपी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik