Kharvas barfi चिकाच्या वड्या/खरवस बर्फी
गाय-म्हैस व्याल्यावर पहिले दोन-तीन दिवसाचे दूध असते त्याला चीक म्हणतात. या चिकात तेवढेच दूध व गूळ किंवा साखर घालून खरवस बनवतात.
चिकाच्या वडय़ांचे साहित्य : चिकाचे दूध, पिठीसाखर पाव वाटी, साधी साखर चिकाच्या निम्मी, वेलची पूड, बदाम किंवा काजू.
कृती : चिकाचे दूध कुकरच्या भांड्यात ठेवून वीस मिनिटे वाफवावे. गार झाल्यावर किसून घ्यावे. जितका कीस असेल त्याच्या निम्मी साखर घ्यावी. जाड बुडाच्या भांडय़ात ठेवून हलवावे. मिश्रण घट्ट होत आले की त्यात वेलची पावडर व पिठीसाखर घालून ओतावे. तूप लावलेल्या भांडय़ात मिश्रण ओतून पसरावे. थंड झाल्यावर वडय़ा पाडाव्यात. काजू किंवा बदाम लावून सजवाव्यात. या वडय़ा आठ दहा दिवस टिकतात.