ganesh chaturthi
✕

मिठाईवाल्यांप्रमाणे कुरकुरीत आणि लुसलुशीत जिलेबी कशी बनवायची? लिहून घ्या रेसिपी

Updated: शनिवार, 2 मे 2026 (15:46 IST)
साहित्य-
पिठासाठी: १ कप मैदा, १ मोठा चमचा बेसन, १ चमचा तूप, चिमूटभर खाण्याचा सोडा किंवा अर्धा चमचा इनो, आणि आवश्यकतेनुसार पाणी.
पाकासाठी: १.५ कप साखर, १ कप पाणी, थोडी वेलची पूड, केशर किंवा थोडा केशरी रंग आणि १ चमचा लिंबाचा रस.
तळण्यासाठी: तूप किंवा तेल.

कृती-
स्टेप १: पाक तयार करणे
सर्वात आधी गॅसवर साखर आणि पाणी एकत्र उकळायला ठेवा. पाक खूप घट्ट नसावा. तो थोडा चिकट झाला की त्यात वेलची पूड, केशर आणि लिंबाचा रस टाका. लिंबाच्या रसामुळे जिलेबी थंड झाल्यावर पाक पुन्हा साखरेसारखा कडक होत नाही. पाक कोमट राहू द्या.

स्टेप २: पीठ भिजवणे
एका बाऊलमध्ये मैदा, बेसन आणि तूप एकत्र करा. आता त्यात थोडे थोडे पाणी घालून गुठळ्या होणार नाहीत अशा बेताने फेटा. पीठ जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नसावे. शेवटी त्यात सोडा किंवा इनो घालून हलक्या हाताने मिक्स करा.

स्टेप ३: जिलेबी पाडणे
हे मिश्रण जिलेबी मेकरमध्ये किंवा सॉसच्या रिकाम्या बाटलीत भरा. नसेल तर दुधाच्या रिकाम्या पिशवीला कोपऱ्यात छोटे छिद्र पाडून त्याचा वापर करा.

स्टेप ४: तळणे
एका पसरट कढईत तेल किंवा तूप गरम करा. गॅस मध्यम ठेवा. जिलेबी गोलाकार पाडा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी-कुरकुरीत होईपर्यंत तळा.

स्टेप ५: पाकात भिजवणे
तळलेली जिलेबी गरम असतानाच कोमट पाकात टाका. फक्त ३० ते ४० सेकंद पाकात ठेवा आणि लगेच बाहेर काढा. जास्त वेळ ठेवली तर ती मऊ पडू शकते.
ALSO READ: Fruit Cream Recipe थंडगार आणि झटपट होणारी फ्रूट क्रीम रेसिपी
खास टिप्स-
पिठात थोडे तूप घातल्याने जिलेबी 'खस्ता' होते.
तेल खूप गरम असेल तर जिलेबीचा आकार बिघडतो आणि गार असेल तर ती फुगत नाही. त्यामुळे मध्यम आचेवरच तळा.
पाक खूप कडक गरम नसावा, फक्त कोमट असावा. कडक पाकात जिलेबी लगेच मऊ पडते.
१ चमचा बेसन घातल्याने जिलेबीला छान पिवळसर रंग आणि वेगळा कुरकुरीतपणा येतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: साखर विरहित खजूर ओट कुकीज; अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Guava Candy पेरू पासून बनवा गोड, चविष्ट आणि आरोग्यदायी कँडी
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

नवरात्रीत नऊ दिवस उपवास करणाऱ्या महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी

NTPC Recruitment : एनटीपीसीमध्ये एससी-एसटी उमेदवारांसाठी भरती, पगार ₹ २ लाख पर्यंत

दररोज शॅम्पूने केस धुवावेत का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला आणि योग्य पद्धत

Navratri 2026 : नवरात्रीचा उपवास करताना दिवसभर थकवा येऊ नये म्हणून आहारात काय घ्यावे

नात्यातील प्रेम आणि विश्वास वाढवायचा असेल तर जोडीदाराला दररोज विचारा हे प्रश्न!

पुढील लेख
Show comments