दत्त जयंती विशेष रेसिपी : सुंठवडा
साहित्य-
खोबरे- 200 ग्रॅम
ग्रॅम खारीक- 100 ग्रॅम
खडीसाखर- 100 ग्रॅम
बादाम
काजू
पिस्ता
मनुके
सुंठ पावडर- एक टिस्पून
बडीशेप - एक टिस्पून
कृती-
दत्त जयंती विशेष प्रसादला सुंठवडा बनवण्यासाठी सर्वात आधी खोबरे किसून हलकेसे भाजून घ्यावे. नंतर खारीक मधील बिया काढून खारीक, बडीशोप आणि काजू, बदाम हे वेगवगेळे भाजून घ्यावे. तसेच खारीक, खडीसाखर, बडीशोप मिक्सरमधून जाडसर दळवी. आता बदाम, काजू, पिस्ता एकत्रित करून मिक्सरमधून जाडसर रित्या दळून घ्यावे. सर्व साहित्य ताटात काढून व सुठ पावडर आणि मनुके घालून चांगल्या प्रकारे मिक्स करावे. तर चला तयार आहे आपली दत्त जयंती विशेष रेसिपी सुंठवडा, नैवेद्यात नक्कीच ठेवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik