suvichar
✕

गणेश जयंती निमित्त बाप्पाला प्रिय असलेले पदार्थ नैवेद्यासाठी नक्कीच बनवू शकता

Updated: बुधवार, 21 जानेवारी 2026 (15:59 IST)
 
उकडीचे मोदक
तांदळाची उकड काढून त्यात ओल्या नारळाचे आणि गुळाचे सारण भरले जाते.
 
तळणीचे मोदक: गव्हाच्या पिठाच्या पारीमध्ये सारण भरून ते तुपात किंवा तेलात तळले जातात.
 
मावा किंवा चॉकलेट मोदक: आधुनिक काळात लहान मुलांच्या आवडीनुसार हे मोदकही बनवले जातात.
 
२. मोतीचूर लाडू 
बाप्पाच्या अनेक मूर्तींमध्ये त्यांच्या हातात लाडू दाखवलेला असतो. विशेषतः मोतीचूर किंवा बेसनाचे लाडू बाप्पाला अत्यंत प्रिय आहे.
 
३. पुरणपोळी 
महाराष्ट्रात कोणत्याही मोठ्या सणाला बाप्पाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. गरम पुरणपोळीवर साजूक तुपाची धार आणि सोबत कटाची आमटी हा बाप्पाचा आवडीचा बेत मानला जातो.
 
४. शिखरण 
बाप्पाला फळांमध्ये केळे खूप आवडते. त्यामुळे दूध, साखर आणि केळीचे काप करून बनवलेले 'शिखरण' हा एक उत्तम आणि झटपट होणारा नैवेद्य आहे.
 
५. तांदळाची खीर
दूध, तांदूळ, गूळ/साखर आणि सुका मेवा घालून केलेली घट्ट खीर बाप्पाला प्रिय आहे. अनेक ठिकाणी नैवेद्याच्या ताटात खीर-पुरीचा बेत असतो.
 
तसेच शास्त्रानुसार बाप्पाला २१ या संख्येमध्ये मोदक अर्पण करणे खूप फलदायी मानले जाते. जर तुम्हाला २१ मोदक करणे शक्य नसेल, तर किमान ५ किंवा ११ मोदकांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: गणपती बाप्पांसाठी स्वादिष्ट नैवेद्य रेसिपी नारळी भात
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Lakshmi Pujan 2026 Wishes in Marathi लक्ष्मी पूजन शुभेच्छा संदेश

Healthy Baked Mathri दिवाळीत सध्या ट्रेंडमध्ये असलेली एअर फ्रायर मेथी-मसाला मठरी

चहा प्यायल्याने पोटात गॅस आणि ॲसिडिटी होते का? चहा पिताना या ५ गोष्टी टाळा!

सर्टिफिकेट कोर्स इन साइबर सिक्योरिटी मध्ये करिअर बनवा, पात्रता, व्याप्ती ,पगार जाणून घ्या

अभ्यंग स्नानाचे आरोग्यदायी फायदे शास्त्र आणि विज्ञान दोन्ही सांगतात, जाणून घ्या

पुढील लेख
Show comments