रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By
Last Updated : मंगळवार, 7 मार्च 2023 (08:22 IST)

होळी विशेष पुरण पोळी

puran poli
होळीचा सण आणि पुरणपोळीचा नेवेद्य नसेल असे शक्य नाही. होळीला घराघरात पुरण पोळीचा नेवेद्य असतो. या मध्ये जायफळपूड घातली की त्याची चवच वेगळी येते. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.    
साहित्य-
3/4 कप,चणा डाळ, दीड कप साखर किंवा गूळ, 1/2 चमचा वेलची पूड,1/4 चमचा जायफळपूड,1 कप गव्हाचे पीठ(मैद्याच्या चाळणीने चाळलेले, 1 /4 कप मैदा, तेल,आणि साजूक तूप.
 
कृती-
चणा डाळ 2 वेळा पाण्याने धुवून अर्धा तास भिजत ठेवा. जास्तीचे पाणी काढून कुकरमध्ये दीडकप पाणी घालून शिजत ठेवा.झाकण बंद करून मध्यम आचेवर 3 शिट्टी देऊन कुकर बंद करा.
डाळ काढून जास्तीचे पाणी काढून द्या आणि डाळ मॅश करून घ्या .
एका कढईत डाळ,गूळ किंवा साखर घालून मध्यम आचेवर शिजत ठेवा. चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. चमच्याने सतत ढवळत राहा. 
पुरण जास्त घट्ट किंवा जास्त सैल करायचे नाही. पुरण शिजले आहे किंवा नाही हे बघण्यासाठी चमचा पुरणात उभा ठेवा. चमचा पडत नाही तर समजावे की पुरण तयार झाले आहे. या मध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड घाला आणि मिसळा. थंड होण्यासाठी ठेवा. 
 
आता एका परातीत गव्हाचे पीठ आणि मैदा घ्या. त्यामध्ये थोडस मीठ आणि तेलाचे मोयन घाला. गरजेप्रमाणे पाणी घालून मऊसर कणीक मळून घ्या. कणीक 15 मिनिटे  झाकून ठेवा. नंतर परत मळून घ्या आणि त्याच्या गोळ्या बनवून घ्या. त्या गोळ्याना हातानेच पुरीचा आकार द्या आणि त्यात पुरणाचे सारण भरून बंद करा आणि लाटून घ्या.
तवा तापत ठेवा आणि त्यावर लाटलेली पोळी घाला आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूने शेकून घ्या. तांबूस सोनेरी रंग आल्यावर काढून घ्या आणि गरम पोळीवर साजूक तूप घालून सर्व्ह करा आणि चविष्ट खमंग पुरणपोळीचा आस्वाद घ्या.