Daily Horoscope
✕

Chocolate Lovers लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचाच आवडता पदार्थ; चॉकलेट बर्फी

Updated: सोमवार, 22 जून 2026 (21:48 IST)
बदाम आणि पिस्त्याचे काप: सजावटीसाठी
 
कृती-
१. मावा आणि साखर एकत्र करणे:
एका कढईत १ चमचा तूप गरम करा आणि त्यात खवा (मावा) हाताने कुस्करून घाला. मंद आचेवर खवा २-३ मिनिटे परतून घ्या, जेणेकरून तो मऊ होईल. आता त्यात पिठीसाखर आणि वेलची पूड घाला. साखर विरघळल्यावर हे मिश्रण थोडे पातळ होईल. मिश्रण सतत ढवळत राहा, जेणेकरून ते तळाशी लागणार नाही. मिश्रण घट्ट होऊन कढईच्या कडा सोडायला लागले की गॅस बंद करा.
 
२. पहिला पांढरा थर (White Layer) तयार करणे:
तयार झालेल्या माव्याच्या मिश्रणाचे दोन समान भाग करा. एक भाग एका तूप लावलेल्या ताटात किंवा बेकिंग ट्रेमध्ये काढा आणि चमच्याने किंवा वाटीच्या तळाने व्यवस्थित पसरवून (Set करून) घ्या. हा तुमचा पहिला पांढरा थर असेल.
 
३. दुसरा चॉकलेट थर (Chocolate Layer) तयार करणे:
कढईत उरलेल्या माव्याच्या दुसऱ्या भागात ३-४ चमचे कोको पावडर आणि २ चमचे दूध घाला. गॅस मंद आचेवर चालू करा आणि कोको पावडर माव्यात व्यवस्थित एकजीव होईपर्यंत १-२ मिनिटे परतून घ्या. आता हे चॉकलेटचे मिश्रण पहिल्या पांढऱ्या थराच्या वर टाका आणि चमच्याने सारखे पसरवून घ्या.
 
४. सजावट आणि तुकडे करणे:
वरच्या चॉकलेट थरावर बदामाचे आणि पिस्त्याचे काप टाका आणि चमच्याने हलके दाबून घ्या. ही बर्फी सेट होण्यासाठी १ ते २ तास बाजूला ठेवून द्या (तुम्ही अर्धा तास फ्रिजमध्येही ठेवू शकता). बर्फी व्यवस्थित सेट झाल्यावर सुरीने तिच्या आवडीनुसार चौकोनी किंवा कापलीच्या आकारात वड्या पाडून घ्या.
 
मिल्क पावडरचा वापर: जर घरी मावा नसेल, तर तुम्ही मिल्क पावडर, कंडेन्स्ड मिल्क आणि तूप एकत्र करून झटपट मावा बनवू शकता.
चॉकलेट फ्लेवर: कोको पावडर ऐवजी तुम्ही डार्क चॉकलेट वितळवून (Melt करून) सुद्धा माव्यात मिक्स करू शकता, यामुळे चव आणखी रिच लागते.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: Chocolate Sandwich Recipe मुलांसाठी बनवा चॉकलेट सँडविच
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Chocolate Shrikhand मुलांना आवडेल असे चॉकलेट श्रीखंड – एकदा ट्राय केल्यावर वारंवार मागतील
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

दिवाळीत दिसायचे आहे सर्वांत सुंदर? ग्लोइंग लुकसाठी मेकअपच्या ‘या’ खास टिप्स फॉलो करा

ईश्वर काय करतो? कहाणी अकबर आणि बिरबलाची

मशरूम पासून झटपट ३ स्वादिष्ट स्नॅक्स! delicious snacks from mushrooms

सावधान! तुम्ही घेत असलेली प्रोटीन पावडर बनावट तर नाही ना? खरेदी करताना 'या' ७ गोष्टी नक्की तपासा!

दिवाळीत मुलांसाठी बनवा चॉकलेट नारळाचे लाडू; कमी साहित्यांत तयार होणारी रेसिपी

पुढील लेख
Show comments