गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. गोडधोड
Written By वेबदुनिया|

खजुराचे पुडींग

साहित्य : 250 ग्रॅम खजूर, 25 ग्रॅम साखर, दोन चहाचे चमचे जिलेटीन पावडर, 1 कप साईसकट दूध, 1 चमचा व्हॅनिला इसेन्स.

कृती : खजूर धुऊन गरम पाण्यात भिजत घालावा, रात्री भिजत टाकला तर सकाळी खजूर चांगला मऊ होतो. आतील बिया काढून वरचे मगस ठेवावे. मिक्सरमध्ये घालून बारीक करावा. जिलेटीन कोमट पाण्यात विरघळून घेऊन गाळणीतून गाळावे. नंतर वाटलेला खजूर, साखर, जिलेटीन, क्रीमचे फेटलेले दूध, व्हॅनिला सर्व मिसळून चमच्याने मिश्रण हालवावे. काचेच्या भांड्यात मिश्रण ओतून फ्रीजमध्ये ठेवावे.