रविवार, 18 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

ऐरोळ्या

ऐरोळ्या
MHNEWS
साहित्य : पाव किलो बेसन, पाव किलो गव्हाचे पीठ, पाव किलो साखर, ५-६ वेलची, २ चमचे तूप मोहनाकरता, २ वालाएवढा सोडा, तळण्यास तूप.

कृती : बेसन आणि गव्हाचे पीठ एकत्र करावे, त्यात पिठीसाखर, वेलचीची पूड, चवीला मीठ, २ चमचे तूप घालून पीठ नीट कालवावे व पाणी घालून भज्याच्या पिठाइतके सरसरीत कालवावे. कढईत तेल घालून ही गोड भजी तळावी.

ह्या गोड भज्यात काजूचे तुकडे, खिसमिस, ओलें खोबरे घातल्यास भजी फारच चविष्ट लागतात. ही भजी वेळेवर करता येतात व चवीला पण छान लागतात.