मंगळवार, 20 जानेवारी 2026
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

घाटले

घाटले तांदळाची पिठी गूळ नारळ वेलची पूड
MHNEWS
साहित्य - अर्धी वाटी सुवासिक तांदळाची पिठी, एक वाटी गूळ, अर्धा नारळ खरवडून, वेलची पूड, चमचाभर खसखस भाजून पूड, मीठ.

कृती - सहा वाट्या पाणी उकळत ठेवावे. त्यात गूळ, खोबरे, चवीपुरते मीठ घालावे. तांदळाची पिठी थंड पाण्यात कालवावी. गॅसवरच्या
पाण्याला उकळी आल्यावर कालवलेली पिठी त्यात हलके-हलके घालावी. मंद गॅसवर घाटले शिजू द्यावे. गुठळी होऊ नये याची काळजी
घ्यावी. शिजल्यावर खसखस पूड, वेलची पूड घालावी. पाच मिनिटांत गॅस बंद करावा.