साहित्य : कणीक ५०० ग्रॅम, नेहमीप्रमाणे जाड असावी. खोबर्याचे लहान तुकडे किंवा किस २ चमचे, गूळ ३०० ग्रॅम, तूप किंवा तेल, विलायची पावडर अर्धा चमचा, पाणी २ कप.
कृती :- गूळ, पाणी व विलायची पावडर एकत्र करुन याचे पातळ मिश्रण करुन घेणे. कणीक घेऊन त्यात ४ चमचे तूप, वर बनविलेले गुळाचे पाणी (आवश्यकतेनुसार) व खोबरं घालून कणीक मळून घेणे व त्याचे छोटे-छोटे पेढे बनवून घेणे. आवडीचा साचा घेऊन हा पेढा त्यावर दाबून घेणे. पेढ्याला साच्याचा आकार आल्यावर त्याला तुपात लाल होईपर्यंत तळून घेणे. निथळून, पूर्णपणे थंड करुन सर्व्ह करावा.