कृती - सर्वप्रथम दोन टे.स्पू. तुपात रवा मंद आचेवर भाजून घ्यावा. साखरेत थोडं पाणी घालून पाक करायला ठेवावा. पाक करताना मिश्रण सारखं ढवळावं, एकतारी पाक झाल्यावर त्यात आमरस घालून पाक हालवत राहावा. पाकाला चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करावा. त्यात रवा, मिल्क पावडर आणि इसेन्स टाकून ते चांगलं मिसळून घ्यावं. मिश्रण सतत हालवत राहावं. घट्ट झाल्यावर ते मिश्रण तूप लावलेल्या ताटात ओतून एकसारखं पसरावं. मिश्रण वाटीनं सारखं करावं. घट्ट झाल्यावर एकसारख्या वड्या पाडाव्यात. मिश्रण जास्त घट्ट वाटल्यास ताटात पसरायच्या आधी त्यात थोडं दूध मिक्स करावं.