1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. गोडधोड
Written By वेबदुनिया|

संत्री रसातील चिरोटे

- स्मिता

संत्री रसातील चिरोटे
ND
साहित्य : 2 वाटी रवा, दीड वाटी साखर, 1 वाटी संत्र्याचा ताजा रस, केशरी रंग पाव चमचा, केशर काड्या चार ते पाच, तळण्यासाठी तूप- मोहन चार लहान चमचे तेल. प्रथम साखर व संत्र्यांचा रस मिसळून उकळायला ठेवा. 1 वाटी पाणी घाला. पाक घट्ट येईपर्यंत उकळा. केशरी रंग घाला, केशरकाड्या घाला. पाक एका भांड्यात काढून ठेवा.

कृती : रवा दोन तास आधी भिजवून ठेवा। रवा चाळून मिचटीभर मीठ व तेलाचे मोहन घाला. चांगले मिसळून अर्धे दूध व अर्धे पाणी घालून रवा भिजवून ठेवा. करताना भिजवलेला गोळा चांगला मळून घ्या. लाट्या करून मोठी पोळी लाटून आत, तूप पातळ करून त्यात कणिक घालून सारण बनवा व पोळीवर पसरून घ्या. गुंडाळी करून चापट करा व लहान लहान काप करून थोडे लाटून घ्या. गरम तुपावर तळून पाकामध्ये टाका, पुरी उलटून काढून घ्या. संत्रीरसातील चिरोटे सर्वानाच आवडतील.