गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. शिक्षक दिन
Written By

Teachers Day Essay शिक्षक दिन निबंध

Teachers day
प्रस्तावना
गुरु-शिष्य परंपरा भारतीय संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण आणि पवित्र भाग आहे. जीवनात आई- वडिलांची जागा कुणीही भरू शकत नाही कारण आम्हाला या सुंदर जगात आणण्याचा श्रेय असल्याने जीवनातील सर्वात पहिले गुरु आमचे आई-वडील असतात. भारतात प्राचीन काळापासून गुरु- शिष्य परंपरा असून शिक्षक हे आम्हाला जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. योग्य दिशेकडे वाटचाल करण्यासाठी प्रेरित करतात. 
 
कधी आणि का साजरा केला जातो शिक्षक दिन 
दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 'गुरु' यांचे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असतं. समाजात त्यांचे एक विशिष्ट स्थान असतं. सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षणात विश्वास ठेवत असून ते एक महान दार्शनिक आणि शिक्षक होते. त्यांना शिक्षणाप्रती अत्यंत प्रेम होते. एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्यात सर्व गुण विद्यमान होते. या दिवशी संपूर्ण देशात भारत सरकारद्वारे श्रेष्ठ शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं.
 
जीवनात शिक्षकांचे महत्त्व
शिक्षकांच्या हातात देशाचे भविष्य असतं कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर, शास्त्रज्ञ, इंजिनियर, लेखक, शिक्षक आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचवणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. आई-वडिलांनंतर शिक्षकांकडून बर्‍याच नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. म्हणूनच शिक्षकांना दुसरे पालक ही म्हटले जाते. आपले विचार, मत आणि व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाट असतो. चांगले संस्कार, शिस्तीत राहणे, आणि योग्य शिक्षणा देऊन जगासमोर उभं राहण्याची ताकद शिक्षकांमुळे येते. या नात्याचा महत्त्व समजवण्यासाठी आणि शिक्षकांप्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिन साजरा केला जातो.
 
कसा साजरा केला जातो हा दिन
या दिवशी अनेक शाळा आणि कॉलेजमध्ये विविध कार्यक्रम जसे उत्सव, शिक्षकांप्रती आभार व्यक्त करणे किंवा आपले मनोगत व्यक्त करणे असे आयोजन केले जातात. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. विद्यार्थी वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षकांचे सन्मान करतात. अनेक विद्यार्थी पुष्पगुच्छ, भेटवस्तू, ग्रीटिंग देऊन आभार प्रदर्शन करतात. 
गुरु-शिष्याचे संबंध
शिक्षक एकाच बागेत विभिन्न रूप आणि रंगाचे फुलं सजवणार्‍या माळ्याप्रमाणे असतो. विद्यार्थ्यांना काट्यांवर हसत चालण्यासाठी प्रेरित करतात. आज प्रत्येक घरात शिक्षा पोहचवण्या प्रयत्न केला जात आहे. आणि शिक्षित भारत हे प्रत्येक शिक्षकांचे स्वप्न असतं म्हणून शिक्षक हे सन्मानाचे हक्कदार आहेत. कारण शिक्षकच चांगले चरित्र निर्मित करू शकतात.
उपसंहार
आज शिक्षणाचा बाजार झाला असून ज्ञानाची बोली लावली जाते. वर्तमानात गुरु-शिष्य परंपरा कलंकित होत आहे. अनेकदा शिक्षकांद्वारे विद्यार्थ्यांशी तर विद्यार्थ्यांद्वारे शिक्षकांसोबत दुर्व्यवहार होत असल्याच्या बातम्या येत असतात. हे बघून आमच्या संस्कृतीची या अमूल्य गुरु-शिष्य परंपरेवर प्रश्न मांडण्यात येतात. विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांचे दायित्व आहे की या महान परंपरेला उत्तम रित्या समजून समाज निर्माणात आपले सहयोग प्रदान करावे.