मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 08
  4. »
  5. व्हॅलेंटाईन डे
Written By वेबदुनिया|

आज कुठे तू सांग

स्व. सौ. मीना दिनकर आठल्ये

पुनव रातीच्या चंद्रा
आज कुठे तू सांग

NDND
सुहास वदनी नील आकाशी
अमृत सिंचन पृथ्वीपाशी
दिलेस अमृत माझ्या ओठी
आज विषाचा प्याला का मज सांग

शशिप्रभा ही जशी विखुरली
चटक चांदणी गाली हसली
दिलीस कोमलकरी कौमुदी
आज कंटक हार कां मज सां

निळ्या मखमली हसल्या तारा
छेडिल्यास तू हृदयीच्या तारा
सुंदर स्वप्ने सूर निर्मिले
आज बेसूर गीत का मज सांग

'व्हॅलेंटाईन डे'च्या कार्ड्‍ससाठी येथे क्लिक करा....