एक दिवस असंच..
अमोल कपोले
डोळ्यांनी चांदणं खुडतांना हळूच हाती लागला तुझ्या पापणीआडचा चंद्र मनात मलाच शोधतांना हलकेच सापडत गेल्या तुझ्या असण्याच्या खाणाखुणापाकळीवरचा दवबिंदू वेचतांना अलगद अंगी बिलगला तुझा चिंबलाजरा स्पर्श दाटलेले भाव कळताना अलवार कुजबुजलेले तुझे गुलाबगोड शब्द आणि सरतेशेवटी तुझ्या नजरेत नेमका समजलेला माझ्या हरवलेपणाचा ओळखीचा अर्थ !