गुरूवार, 7 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

वास्तुशास्त्रानुसार कुठे असावे घरातील कपाट

वास्तुशास्त्रानुसार घरात कपाट ठेवण्याची देखील एक विशेष जागा असते. यामुळेच तुमच्या घरात धन, समृद्धि येते. जर कपाट चुकीच्या दिशेला ठेवले असेल तर आर्थिक नुकसान ही समस्या निर्माण होते आणि प्रगतीमध्ये अडचण निर्माण होते. म्हणून जाणून घ्या की घरात कपाट कुठल्या दिशेला ठेवावे. 
 
ईशान्य कोन- या दिशेला पैसा, धन आणि दागिने ठेवले तर हे दर्शवते की घरातील मुख्य व्यक्ती बुद्धिमान आहे आणि जर उत्तर-ईशान्य दिशेला ठेवल्यास घरातील एक कन्या आणि जर पूर्व-ईशान्य दिशेला ठेवल्यास एक पुत्र खूप बुद्धिमान आणि प्रसिद्ध असतो. 
उत्तर दिशा- घराच्या या दिशेला पैसे आणि दागिने ज्या कपाटात ठेवतात ते कपाट घरातील उत्तर दिशेला असलेल्या खोलीत दक्षिण दिशेला लावून ठेवावे. या प्रकारे कपाट उत्तर दिशेला उघडेल त्या कपाटात ठेवलेल्या दागिन्यांमध्ये नेहमी वाढ होत राहील. 
पूर्व दिशा- इथे घरातील धन आणि कपाट ठेवणे शुभ मानले जाते. तसेच धनात वाढ देखील होते. 
आग्नेय कोन- या दिशेला जर कपाट ठेवले तर धन घटते कारण घरच्या मुख्य व्यक्तीचा पगार घर खर्चा पेक्षा कमी असल्या कारणाने असे होते.   
दक्षिण दिशा- या दिशेमध्ये धन, सोन, चांदी, दागिने ठेवल्याने नुकसान तर होते पण प्रगती विशेष होत नाही. 
नैऋत्य कोन- इथे धन, महाग सामान, दागिने ठेवल्यास ते टिकतात पण एक गोष्ट अवश्य असते की इथे धन आणि सामान चुकीच्या पद्धतीने कमवलेला असतो. 
पश्चिम दिशा- इथे धन आणि संपत्ती ठेवल्यास साधारण लाभ मिळतात. तसेच घरातील मुख्य व्यक्ती आपल्या स्त्री-पुरुष मित्रांचा सहयोग असतांना देखील खूप मेहनतीने धन कामवावे लागते. 
वायव्य कोन- इथे धन ठेवले असेल तर खर्च एवढे पैसे कमावणे कठीण होते. अश्या व्यक्तीचे बजेट नेहमी गडबडलेले असते.  

कपाटाला नेहमी दक्षिणच्या भिंतीला लावून ठेवावे. कपाटाचे दार उत्तर दिशेला उघडेल. उत्तर दिशा कुबेरची दिशा असते. उत्तर दिशेला कपाटाचे दार उघडल्यास धन आणि दागिन्यांमध्ये वाढ होते. जर कपाट बेडरूम मध्ये असेल तर उत्तर-पश्चिम किंवा दक्षिण-पश्चिम दिशेला ठेवावे. तसेच अश्या पद्धतीने ठेवावे की बेडरुमच्या भिंतीला स्पर्श व्हायला नको. कमीत कमी 2 इंच दूर ठेवावे. जर कपाट बेडरूमध्ये ठेवले असेल जर कपाटला अरसा नसेल तर चांगले आहे. जर तुमच्या कपाटचा रंग तुमच्या घरातील भिंतींशी मॅच करत असेल तर उत्तम आहे. कपटावर व्हाइट, सॉफ्ट ब्लू, ग्रीन, पेस्टल आणि क्रीम सारखे लाइट कलर मध्ये पेंट असणे आवश्यक असते. यामध्ये अत्तराची बाटली, चंदन, अगरबत्तीचे पॅकेट देखील ठेऊ शकतात. ज्यामुळे त्यात सुगंध दरवळत राहील. कपाटात जुने, फाटलेले कपडे ठेऊ नये. तसेच कपाट सरळ जमिनीवर ठेऊ नये त्याच्या खाली कापड किंवा पृष्ठ, लकडाची चौकट ठेवावी यामुळे वास्तुदोष निर्माण होणार नाही. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik