बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : गुरूवार, 7 मार्च 2024 (09:06 IST)

घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस खूप खास

shravan puja
वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला साजरी केली जाते. या दिवशी भोलेनाथाची पूजा करण्याचा नियम आहे. भगवान शंकराचा रुद्राभिषेक केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्यांचे सर्व संकट दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. महाशिवरात्रीची पूजा करून घरातील वास्तुदोषही दूर करता येतो. महाशिवरात्रीच्या दिवशी कोणकोणत्या उपायांनी हे दोष दूर केले जाऊ शकतात ते जाणून घेऊया.
 
महा शिवरात्रीचे उपाय
असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर अभिषेक केल्यानंतर जलधारीचे पाणी घरी आणावे आणि 'ॐ नमः शम्भवाय च मयोभवाय च नमः शंकराय च' या मंत्राचा उच्चार करताना हे पाणी घरात शिंपडावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख-समृद्धी येते.
 
घरामध्ये सतत कलह, रोग किंवा इतर समस्या असतील तर त्या दूर करण्यासाठी घराच्या ईशान्य दिशेला रुद्राभिषेक केल्याने अडचणी दूर होतात.
 
घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या पूर्व किंवा वायव्य दिशेला बेलाचे झाड लावणे फायदेशीर ठरेल. या झाडाला नियमित पाणी द्यावे. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा.
 
घरातील संकट दूर करण्यासाठी घराच्या उत्तर-पूर्व दिशेला शिव कुटुंबाचा फोटो लावा. यामुळे घरात शांतता राहते आणि घरातील सदस्यांचे विचार शुद्ध होतात.