शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (08:42 IST)

Trishul घरात आणा चंदीचा त्रिशूळ, सर्व अडचणींपासून मिळेल मुक्ती

श्रावण महिना महादेवाचा अती प्रिय महिना आहे. या महिन्यात वास्तूप्रमाणे काही सोपे उपाय करून तुम्ही महादेवाची कृपा प्राप्त करू शकता. श्रावण महिन्यात हे उपाय केल्याने सकारात्मक ऊर्जेत अप्रत्याशितरित्या वाढ होते. तर जाणून घेऊ या उपायांबद्दल.  
 
श्रावण महिन्यात नंदीवर स्वार महादेवाचे चित्र घरातील देवघरात स्थापित करावे. महादेवाला निळ्या रंगाचे पुष्प अर्पित केले पाहिजे. चांगले आरोग्य आणि सौभाग्यासाठी  पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा. श्रावण महिन्यात एकाच वेळेस भोजन केले पाहिजे.  
 
महादेवाचे त्रिशूळ तिन्ही लोकाचे प्रतीक आहे. श्रावण महिन्यात चांदीचा त्रिशूळ घरात आणल्याने बर्‍याच अडचणी दूर होतात.  
 
डमरू महादेवाचे पवित्र वाद्य यंत्र आहे. याच्या ध्वनीमुळे समस्त नकारात्मक शक्ती दूर होते. आरोग्यासाठी डमरूची ध्वनी असारकारक मानण्यात आली आहे. श्रावण महिन्यात डमरूला घरात आणून एखाद्या लहान मुलाला हे भेट म्हणून द्यायला पाहिजे.  
 
महादेव आपल्या पायात चांदीचा कडा धारण करतात. श्रावण महिन्यात चांदीचा कडा घरात आणल्याने तीर्थ यात्रांचे योग बनतात. घरात आरती करताना दोन दिवे लावायला पाहिजे. आरती संपन्न झाल्यानंतर एक दिवा महादेवासमोर ठेवायचा व दुसरा दिवा घराच्या अंगणात ठेवून द्या. असे केल्यानं घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. 
 
श्रावणाच्या महिन्यात घरात महादेवाच्या अर्द्धनारीश्‍वर स्वरूपाची प्रतिमा स्थापित करावी. श्रावण महिन्यात रुद्राक्ष धारण केल्याने मनाला शांती मिळते.