मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (09:40 IST)

या सहा सवयी असल्यास त्वरा सोडून द्या, तोटा संभवतो

बऱ्याचदा आपल्या काही वाईट सवयींमुळे घरात वास्तुदोष उद्भवतात. 
 
बऱ्याच वेळा असे आढळून येते की घर वास्तुशास्त्राप्रमाणेच बनवलेलं असतं आणि घरात पंच घटकांचे संतुलन देखील बरोबर असतात पण तरी ही समस्या किंवा त्रास यथावतच असतात. त्रासाने आपल्याला वेढलेलं असतं. आपल्याला त्याची कारणे देखील कळून येत नाही. तरीही आपण अस्वस्थ राहतो. बऱ्याच वेळा काही चुकीच्या सवयी देखील घरात वास्तू दोष उद्भवतात. गरज आहे ते फक्त आपल्याला आपल्या काही सवयींना बदलायची. 
 
1 चपला-जोडे पसरवू नका - 
घरात जुने चपला जोडे ठेवल्यानं नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, घराच्या समस्या किंवा त्रास त्यामुळे संपतच नाही. तसेच घरात चपला - जोडे पसरल्यामुळे घरात वाद संभवतात आणि संबंध बिघडू शकतात. ज्या घरात जोडे-चपला पसरलेले असतात, त्या घरात शनीचा दुष्परिणाम होतो. कारण शनी हे पायाचे घटक आहे म्हणून पायाशी निगडित असलेली वस्तू व्यवस्थित ठेवा.
 
2 कोठे ही थुंकू नये -
बऱ्याच लोकांची सवय असते वारंवार कोठे ही थुंकण्याची. असे केल्यानं आपली कीर्ती आणि सन्मानास आणि आपली प्रतिष्ठा खराब होऊ शकते. आपल्या या चुकीच्या सवयीमुळे बुध आणि सूर्य ग्रह वाईट परिणाम देऊ लागतात. 
 
3 उष्टी भांडी ठेवणं - 
बऱ्याच बायकांची सवय असते आपली उष्टी भांडी रात्रीच्या वेळी सिंक मध्ये तसेच ठेवतात, आपली ही चुकीची सवय घरात वास्तू-दोष निर्माण करते. अश्या प्रकारे बऱ्याच लोकांची सवय असते ताटातच हात धुण्याची आणि उष्टया ताटावरून तसेच उठायची. ही सवय शास्त्राविरुद्ध आहे. अश्या लोकांना जीवनात यशस्वी होण्यासाठी फार संघर्ष करावा लागतो. घरात बरकत नसते. यामुळे मानसिक अशांती वाढते. कुठे ही उष्टी भांडी ठेवणं किंवा भांड्याना पसरवून ठेवणं, आपल्या या सवयीमुळे चंद्र आणि शनी खराब होतात. 
 
4 पाणी न पाजणे - 
बऱ्याच लोकांची सवय असते की आपल्या घरात आलेल्या पाहुण्यांना पाण्याचे देखील विचारात नाही. पाहुणे असो किंवा कोणी ही असो आपल्या घरात जे कोणी येणार त्याला आदर देऊन स्वच्छ पाणी प्यायला द्यावं. जर आपण कोणालाही पाणी प्यायला देत नसाल तर राहू ग्रह रागावतो. ज्या मुळे आपल्या घरावर अचानक कोणतीही समस्यां उद्भवू शकते.
 
5 झाडे वाळू देऊ नये - 
वास्तूमध्ये कोरडे झाडे निराशेचे सूचक असतात, हे वाढीत बाधक असतात. जर आपण आपल्या घराच्या अंगणात रोपटं लावली असल्यास तर त्यांची व्यवस्थितरीत्या जोपासना करा. झाडांना नियमितपणे सकाळ संध्याकाळ पाणी दिल्याने सूर्य, बुध आणि चंद्राशी निगडित त्रास दूर होतात. मनातून उदासीनता दूर होऊन आयुष्य तणाव मुक्त होतं.
 
6 घरात पसारा असणं - 
बऱ्याच घरात वस्तू योग्य ठिकाणी आणि व्यवस्थितरीत्या ठेवले जात नाही. त्याप्रमाणे सकाळी उठल्यावर अंथरूण, पांघरूण तसेच ठेवलं जातं आणि त्यांना व्यवस्थित न करता त्यावर तसेच झोपतात. घाण आणि अव्यवस्थित असलेले अंथरूण, पांघरूण घरात नकारात्मकता वाढवतात. ज्यामुळे आपल्या कामांत लक्ष लागत नाही. तसेच सगळीकडे पसारा असल्यास राहू-शनीत बिगाड होतो.