शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By

गोमती चक्र ठेवण्याचे एवढे फायदे, आपल्या माहीत आहे का

1. सतत आर्थिक हानी होत असल्यास महिन्याच्या पहिल्या सोमवारी 11 अभिमंत्रित गोमती चक्रांना हळदीने तिलक करावे आणि महादेवाचे ध्यान करून पिवळ्या कपड्यात गुंडाळून घरात मिरवावे. नंतर वाहत्या पाण्यात प्रवाहित करावे. निश्चित लाभ होईल.
 
2. एखाद्या व्यक्ती किंवा मुलांना वारंवार नजर लागत असल्यास एखाद्या सुनसान जागेवर जाऊन 3 गोमती चक्र स्वत:वरून 7 वेळा ओवाळून मागील बाजूला टाकून द्यावे. मागे वळून न बघता परत यावे. अशाने नजर दोष दूर होतं.
 
3. आपण वायफळ खर्च करत असला तर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी 11 अभिमंत्रित गोमती चक्र पिवळ्या कपड्यात ठेवून देवी लक्ष्मीचे स्मरण करत विधिपूर्वक पूजन करावे. दुसर्‍या दिवशी त्यातून 4 गोमती चक्र उचलून घरातील चारी कोपर्‍यात एक-एक ठेवावे. आणि 3 गोमती चक्र लाल कपड्यात गुंडाळून धन ठेवत असलेल्या जागेवर ठेवून द्यावे. त्यातून 3 चक्र पूजा स्थळी ठेवून द्यावे. शेष एक चक्र एखाद्या मंदिरात आपली समस्या निवेदन करून देवाला अर्पित करावे.
 
4. आपल्या व्यवसायाला वाईट नजरेपासून बचावासाठी 11 अभिमंत्रित गोमती चक्र आणि तीन लहान नारळ पूजा केल्यावर पिवळ्या कपड्यात गुंडाळून प्रमुख दारावर लटकून द्यावे. याने वाईट नजर लागणार नाही.
 
5. मुलं खूप घाबरट असल्यास महिन्यातील पहिल्या मंगळवारी अभिमंत्रित गोमती चक्रावर हनुमानाच्या उजव्या खांद्यावरील शेंदुराने लाल कपड्यात बांधून मुलांच्या गळ्यात घालावे. याने मुलांची भीती नाहीशी होईल.