मंगळवार, 5 नोव्हेंबर 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 9 ऑक्टोबर 2023 (07:59 IST)

Keep the dustbin at the right place घरात ठेवा योग्य जागेवर डस्टबिन नाहीतर होऊ शकत नुकसान

dustbin
Keep the dustbin at the right place आमच्या शास्त्रांमध्ये दिशेचे फार महत्त्व आहे. याचे पालन आम्ही रोजच्या जीवनात करतच असतो. अमाच्या जीवनात कुठलेही संकट यायला नाही पाहिजे त्यासाठी आम्ही आमच्या घरातील वस्तूंना योग्य जागेवर ठेवतो. अशात घरातील कचरापेटी ठेवण्याची ही योग्य जागा असायला पाहिजे. तर जाणून घेऊ कचरापेटी ठेवण्यासाठी कोणती दिशा शुभ असते आणि कोणती अशुभ असते.  
 
घरामध्ये सुख शांतीसाठी कायम राहावी यासाठी घरामध्ये कोणते सामान कोणत्या जागेवर ठेवायला पाहिजे हे माहीत असणे फारच गरजेचे आहे. घरात कचरापेटी ठेवण्याची योग्य जागा असायला पाहिजे. बर्‍याच वेळा चुकीच्या जागेवर कचरा पेटी ठेवल्याने त्याचा चुकीचा प्रभाव पडतो.  
 
वास्तूनुसार घरामध्ये कधीपण उत्तर दिशेत कचरा पेटी नाही ठेवायला पाहिजे. यामुळे घरात राहणार्‍या लोकांना नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून जर डस्टबिन तिथे ठेवले असेल तर लगेचच तेथून हटवून द्या.  
 
उत्तर दिशेला लक्ष्मीची दिशा म्हणतो. अशा जागेवर कचरा पेटी ठेवल्याने अडचणी येतात आणि धनहानी होऊ लागते. घरात लक्ष्मीचा वास राहत नाही.  
 
जर तुम्ही एखाद्या नोकरीच्या शोधात असाल आणि सारखे सारखे प्रयत्न केले तरी नोकरी मिळत नसेल तर एकदा आपल्या घरातील कचरा पेटीची जागा बदलून बघा, नक्कीच यश मिळेल.