मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Updated : सोमवार, 24 मार्च 2025 (07:22 IST)

Lemon Vastu घराचे वास्तुदोष दूर करतो लिंबू

vastu tips
vastu tips लिंबू जसे आरोग्यासाठी फायदेशीर असतं, तसेच ज्योतिषशास्त्रात लिंबाचा वापर दृष्ट काढण्यासाठी केला जातो. तसेच लिंबू वास्तुदोष देखील दूर करतो. असे म्हटले जाते की लिंबाचा पौधा घरातील नकारात्मक शक्तीला घरात राहू देत नाही. ज्यामुळे वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो.
 
जर तुमच्या घरात अचानक कोणी व्यक्ती आजारी पडला आणि कुठले ही औषध त्याला लागू पडत नसतील तर एका लिंबावर काळी शाई ने 307 लिहा आणि त्या व्यक्तीवरून उलट्या दिशेने सात वेळा फिरवा आणि झाडावर टाकून द्या. याने त्याच्या आरोग्यात सुधारणा होईल.
 
तसेच जर तुम्हाला रात्री झोपताना वाईट स्वप्न येत असेल आणि त्यामुळे तुम्ही झोपू शकत नसाल तर तुमच्या जवळ एक हिरवा लिंबू ठेवून झोपा आणि तो लिंबू वाळल्यानंतर त्याच्या जागेवर दुसरा लिंबू ठेवा. असे पाच वेळा करा. यामुळे वाईट स्वप्न येण्याची तुमची समस्या नक्कीच दूर होईल.