गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. वास्तुशास्त्र
  3. वास्तुसल्ला
Written By
Last Modified: मंगळवार, 6 ऑक्टोबर 2020 (10:21 IST)

वास्तू टिप्स : चुकून देखील आपल्या उशीखाली या गोष्टी ठेवू नका

वास्तुशास्त्रानुसार आपल्या उशीच्या खाली अनेक वस्तू ठेवणं आपल्यासाठी धोकादायक असू शकतं. यामुळे आपल्या जीवनावरच नव्हे तर आपल्या वैवाहिक जीवनावर देखील नकारात्मक प्रभाव पडतो. चला तर मग जाणून घ्या की अश्या कोणत्या वस्तू आहेत ज्यांना आपल्या उशीखाली ठेउ नये.
 
बरीचशी लोकं अशी आहेत जी झोपताना उशी वापरतात. बरेच जण अशे असतात की ज्यांना उशी शिवाय झोपच येत नाही. परंतु ही त्यांची वैयक्तिक आवड असते. अश्या परिस्थितीत बऱ्याचश्या लोकांची सवय असते की हेयर बॅण्ड, मोबाईल, घड्याळ इत्यादींसह बऱ्याच वस्तू उशीखाली ठेवून झोपतात.
 
वास्तुशास्त्रानुसार उशीखाली वस्तूंना ठेवणं आपल्यासाठी धोकादायक असू शकतं. या मुळे आपल्या जीवनावरच नव्हे तर आपल्या वैवाहिक जीवनावर देखील नकारात्मक प्रभाव पडतो. या वस्तुंना उशीखाली ठेवू नये.
 
* घड्याळ - 
उशीखाली घड्याळ ठेवून झोपल्याने त्याचा आवाजामुळे झोपेत अडथळा येतोच, त्याच्यासह त्यामधून निघणाऱ्या इलेक्ट्रो मैग्नेटिक लहरी आपल्या मेंदूवर आणि आपल्या हृदयावर वाईट प्रभाव पाडतात. या लहरींमुळे संपूर्ण खोलीत नकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी आपली मानसिक शांतीला विस्कळीत करते आणि ताण तणाव निर्माण करते. त्याच बरोबर आपल्या विचारसरणीला नकारात्मक बनवते.
 
* पर्स -
वास्तुनुसार कधीही पर्स आपल्या उशीखाली ठेवून झोपू नये. कारण या मध्ये लक्ष्मीचा वास्तव्य असतो. ज्यांची जागा तिजोरी मानली जाते. उशीखाली पर्स ठेवल्यानं अवांछित खर्च वाढतं. त्याच बरोबर आपल्या नात्यातील गोडवा कमी होतो.
 
* पुस्तके - 
बऱ्याच लोकांची सवय असते झोपताना पुस्तक वाचून ते उशीखाली ठेवतात. असं करू नये असं केल्यानं आपल्या शरीरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपल्या आरोग्यावर वाईट प्रभाव पडतो. कारण पुस्तक, मासिक, वर्तमानपत्र हे बुधाशी निगडित आहे. अश्यामुळे त्यांच्यावर काहीही प्रभाव पडला तर त्याचा आपल्या बुद्धीवर आणि आपल्या करिअर वर वाईट परिणाम पडतो.
 
* जोडे-चपला - 
वास्तुनुसार झोपताना चपला कधीही जवळ ठेऊन झोपू नये. यामुळे आपले मन आणि हृदय अस्वस्थ होऊ शकतं. यासह आपली झोप देखील प्रभावी होऊ शकते.
 
* पाण्याचा ग्लास - 
झोपताना आपल्या उशीजवळ पाणी ठेवण्याची सवय बऱ्याच लोकांची असते. यामुळे आपल्या जीवनावर वाईट प्रभाव पडतो. आपण तणावग्रस्त होऊ शकता. आणि आपल्याला एखाद्या कामाला करण्यासाठी लक्ष केंद्रित करताना त्रास होऊ शकतो.